मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री तसेच निर्माती क्रांती रेडकर अनेकदा चर्चेत असते. क्रांती रेडकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या दोन्ही मुलींचे व्हिडीओ ती अनेकदा शेअर करत असते. पण, आता तिने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिने स्वत:साठीच एक आव्हान स्वीकारलंय. मी हे नाही केलं तर माझं नावच बदला, असंदेखील तिने प्रेक्षकांना सांगितलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रांती रेडकरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती म्हणाली आहे की, “माझं ठरलंय. येत्या दहा दिवसांत मी पाच किलो वजन कमी करणार आहे आणि जर मी असं नाही केलं तर माझ नाव बदलून टाका. दुसरं काहीतरी चांगलं ठेवा.”

हेही वाचा… बोमण इरानींच्या गाडीत बसल्यानंतर नम्रता संभेरावला मिळाला आयुष्यभर जपणारा ‘तो’ अनुभव; म्हणाली, “मी पहिल्यांदा बीएमडब्ल्यूमध्ये…”

“माझ ठरलंय” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. क्रांतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यावर अर्थातच अनेक जणांनी कमेंट्स केल्या आहेत. क्रांतीच्या या व्हायरल व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “झालं तर क्रांती नाही तर आंटी.” तर काही जणांनी नवीन नावे सुचवली आहेत.

“वजन कमी करायचंय की नाव बदलायचंय”, अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली आहे. तर “वजन काटा कमी करून टाका, वजन आपोआप कमी होईल” असं एक जण म्हणाला. “मिसेस वानखेडे तुमच्या भुवया खऱ्या आहेत का?” असा प्रश्नही एका नेटकऱ्याने विचारला.

हेही वाचा… “संकर्षण कऱ्हाडे भित्रा ससा होता”, अभिजीत खांडकेकरने सांगितला मित्राबद्दल ‘तो’ किस्सा, म्हणाला…

दरम्यान, क्रांती रेडकरच्या कामाबाबत सांगायचं झालं तर क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘रेनबो’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हितेन पटेल, ऋषी सक्सेना, ऊर्मिला कोठारे, प्रसाद ओक अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहेत.