अभिनेत्री क्षिती जोगनं आपल्या अभिनयानं मराठी, हिंदी मनोरंजन सृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमातून तिनं आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेला करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात ती झळकली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचं अजूनही भरभरून कौतुक करण्यात येतं आहेत. पण अशातच क्षितीचं फेसबुक पेज हॅक झाल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “…म्हणून मी भाजपामध्ये प्रवेश केला”; प्रिया बेर्डेंनी सांगितलं राष्ट्रवादी सोडण्याचं कारण; म्हणाल्या, “मी घुसमट…”

कलाकार मंडळी नेहमी चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन जीवनातला अनुभव किंवा फोटो, व्हिडीओ सतत शेअर करत असतात. पण त्यांचं बऱ्याचदा सोशल मीडियावरील पेज हॅक होतं. काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक केदार शिंदे यांचं इन्स्टाग्रामवरील पेज हॅक झालं होतं. त्यानंतर आता क्षिती जोगचं फेसबुक पेज हँक झालं आहे. तिनं स्वतः याबाबत इन्स्टाग्रामवरून माहिती दिली आहे.

हेही वाचा – अभिनेता सुयश टिळक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकला

इन्स्टाग्राम स्टोरीवर क्षिती जोगनं एक फोटो पोस्ट करून फेसबुक पेज हॅक झाल्याचं सांगितलं आहे. तसेच त्या फोटोमधून तिनं चाहत्यांना एक विनंती केली आहे. या फोटोमध्ये लिहिण्यात आलं आहे की, “चलचित्र मंडळीची निर्माती, अभिनेत्री क्षिती जोश यांचं फेसबुक पेज हॅक करण्यात आलं आहे. पेजवरून काही अश्लील व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. फॉलोवर्सना विनंती आहे की, अशा पोस्टकडे आपण दुर्लक्ष करावं. आम्ही पेज पुन्हा सुरळीत होण्यासाठी कार्यरत आहोत. तरी प्रेक्षकांनी, चाहत्यांनी संयम ठेवावा, हीच विनंती. आपल्या मनोरंजनासाठी सदैव तत्पर चलचित्र मंडळी.”

हेही वाचा – ‘तुम्ही तुमचं खरं नाव का लावत नाही?’ चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या…

दरम्यान, अभिनेत्री क्षिती जोगनं करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली आहे. तिच्या याचं भूमिकेच सध्या चांगलं कौतुक होतं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress kshitee jog facebook page hacked pps