मराठी अभिनेता हेमंत ढोमे चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. हेमंत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्टबद्दल हेमंत सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना माहिती देत असतो. अनेकदा तो फोटोही शेअर करताना दिसतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमंत ढोमेने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने पांढऱ्या रंगाचं शर्ट परिधान केलेलं दिसत आहे. चष्मा लावून हेमंतने फोटोसाठी पोझ दिलं आहे. पण, हेमंतने या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> ३० वर्षांनंतर ‘माहेरची साडी २’ येणार? चित्रपटाच्या सिक्वेलबाबत अलका कुबल म्हणाल्या, “मला…”

हेही वाचा>> “नातेवाईक हा प्रकारच मला नकोसा वाटतो” प्रसाद ओकचं वक्तव्य, म्हणाला “माझ्या पत्नीने…”

“वाघ तर आपण लहानपणापासून होतोच! शिकार आत्ता आत्ताच करायला लागलोय…” असं कॅप्शन हेमंतने या फोटोला दिलं आहे. हेमंतच्या या फोटोवर त्याची पत्नी व अभिनेत्री क्षिती जोगने कमेंट केली आहे. “कसली शिकार? पालीची? कारण तेवढंच शक्य आहे आता”, असं क्षितीने कमेंटमध्ये म्हटलं आहे. हेमंतच्या पोस्टवरील क्षितीची ही कमेंट पाहून चाहत्यांनाही हसू अनावर झालं आहे.

हेही पाहा>> लग्न, मुलगा, सहा वर्षांनी घटस्फोट, वादविवाद अन्…; दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली शालीन भानोतची पत्नी दलजित कौर, पाहा फोटो

हेमंत ढोमेने अनेक चित्रपटात काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनयाबरोबरच त्याने दिग्दर्शनही केलं आहे. त्याने दिग्दर्शित केलेला ‘झिम्मा’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress kshiti jog commented on actor hemant dhome post seeking attention kak