नाटक, मालिका, चित्रपट या सर्वच माध्यमातून अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम हिने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. मधुरा वेलणकर ही ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर आणि रजनी वेलणकर यांची कन्या आहे. मधुरा ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. नुकतंच तिने तिच्या बालपणीच्या आणि सिनसृष्टीतील करिअरबद्दलच्या आठवणी सांगितल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधुरा वेलणकरने नुकतंच अभिनेत्री सुरेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या मुलाखतींच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिला वडिलांच्या शिस्तीबद्दल प्रश्न विचारला. “तुझे आई-वडील दोघेही कलाकार होते, मग त्यांचा तुला कसा फायदा झाला? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने दिलखुलास पद्धतीने उत्तर दिले.
आणखी वाचा : “या देशाची ओळख जेव्हा…”, नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

“आई-बाबांनी कायम त्यांची नोकरी सांभाळून कलाक्षेत्रात काम केलं. आई त्यावेळी शिक्षिकेची नोकरी करायची आणि बाबा एअर इंडियामध्ये होते. त्यांनी नेहमी मनाला आवडेल ते काम केलं. त्यावेळी या व्यवसायावर पोट चालवणं शक्य नव्हतं. ते करणारी माणसं कमी होती. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची किंमत कळायची”, असे मधुरा वेलणकर म्हणाली.

“माझे वडील प्रदीप वेलणकर हे फार मोठे अभिनेते आहेत, असं आम्हाला कधीच जाणवलं नाही. कारण घरात ते आई-बाबा असायचे. बाबा आम्हाला फार कमी मिळायचे. ते ५ वाजता आले तरी ८ वाजता लगेचच शो साठी जायचे. यामुळे बाबा बाहेर काम करतात, म्हणून कमी मिळतात, असं होतं. पण तेच बाबा भाजी आणायला, दळण आणायला जायचे. त्यामुळे ते फार मोठे आहेत, असं कधीही वाटलं नाही.

पण एकदा पाचवीत असताना मी एक एकांकिका केली. त्यावेळी आई बसवायची आणि आईसमोर मी ते बिनधास्त करु शकायची. एकदा बाबा या एकांकिकेची तालीम पाहायला आले होते. तेव्हा मी खूप घाबरले. त्यांच्यासमोर काम कसं करायचं, असा प्रश्न मला पडला होता. मी घाबरुन पटकन येऊन काम संपवून निघून गेले होते. त्यावेळी ते इतके मोठे कलाकार आहेत, हे डोक्यात कुठेतरी असावं म्हणून हे घडलं”, असा किस्साही मधुराने यावेळी सांगितला.

आणखी वाचा : “मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे?” मनसेचा संतप्त सवाल, म्हणाले “दुर्दैवाने, आज ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट…”

दरम्यान मधुरा वेलणकरने आतापर्यंत अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘अधांतरी’, ‘खबरदार’, ‘मातीच्या चुली’, ‘सरीवर सरी’, ‘उलाढाल’, ‘एक डाव धोबीपछाड’, ‘हापूस’ यांसारख्या अनेक चित्रपटात ती झळकली. ‘मृण्मयी’ या मराठी मालिकेद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress madhura velankar talk about her father pradeep velankar life nrp
First published on: 09-10-2023 at 14:01 IST