दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने दहा दिवसात २६ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता या चित्रपटाबद्दल अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मधुराणी प्रभुलकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने ‘आई’ कडून ‘बाईपण ‘ ला ‘ भारी ‘शुभेच्छा….!! असे कॅप्शन देत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या टीमचे कौतुक करताना दिसत आहे.
आणखी वाचा : “पेंग्विनची काय गरज…” शशांक केतकरने बस स्टॉपवरील ‘तो’ फोटो केला शेअर, कॅप्शन चर्चेत

मधुराणी प्रभुलकर काय म्हणाली?

“‘बाईपण भारी देवा’ या भारी चित्रपटाच्या टीमचं कौतुक करायला मी हा व्हिडीओ करत आहे. मी जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला होता, तेव्हा मी ठरवलं होतं की मला इतरांचं माहिती नाही, पण मी हा चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन पाहणार आहे. जसं मला वाटलं तसंच महाराष्ट्रातील, जगभरातील असंख्य मराठी बायकांना वाटलं असणार, म्हणूनच इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे.

केदार सर तुमचे खूप खूप आभार. खूप सुंदर चित्रपट, फारच छान. तु्म्ही खूप चांगला चित्रपट आम्हाला दिलात. खूप उत्तम स्त्री व्यक्तीरेखा दिलात आणि रोहिणी ताई, वंदना मावशी, सुकन्या, शिल्पा, सुचित्रा, दीपा तुम्ही काय चाबूक काम केली आहेत. लव्ह यू. तुम्ही पुन्हा एकदा सर्व गाजवलं आहात.

मला जिओ स्टुडिओ आणि निखिल साने यांच्या टीमचंही कौतुक करायचं आहे, कारण त्यांनी हा चित्रपट खूप उत्तम पद्धतीने प्रमोट केला आहे. त्याबरोबरच पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे की, चित्रपट चांगला असेल, त्याचे प्रमोशन उत्तम झाले, तो लोकापर्यंत पोहोचला गेला तर आजही मराठी माणूस एकत्रित जाऊन चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहे. अशा छान चित्रपटाची मराठी चित्रपटसृष्टीला गेले काही वर्षे गरज होती. जो तुम्ही दिलात, तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. लव्ह यू”, असे तिने म्हटले आहे.

आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

दरम्यान मधुराणी प्रभुलकर ही ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधती म्हणजेच आई हे पात्र साकारत आहे. या पात्रामुळेच ती घराघरात पोहोचली. तिच्या पात्राची कायमच चर्चा पाहायला मिळते. ती सोशल मीडियावर सक्रीय असते.