अभिनेत्री व नृत्यांगना माधुरी पवार मुळची साताऱ्याची आहे. गरीब घरात जन्मलेल्या माधुरीचा चित्रपटसृष्टीत येण्याचा प्रवास सोपा नव्हता. माधुरी पत्र्याच्या झोपडीत राहायची. त्याच घरात राहून तिने शिक्षण पूर्ण केलं आणि तिची डान्सची आवडही जपली. तिने ‘रानबाजार’ या मराठी वेब सीरिजमध्ये प्रेरणा पाटील नावाची भूमिका साकारली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालकलाकार साईशा भोईरच्या आईचे दागिने अन् मालमत्ता जप्त होणार; बँक खात्यात आढळले कोट्यवधी रुपये

माधुरी खऱ्या आयुष्यात टॉमबॉय आहे. शाळेत असताना मुलांशी भांडणंही झाली होती, असं तिने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ११वी मध्ये असताचा एक किस्सा तिने शेअर केला आहे. माधुरी म्हणाली, “कॉलेजला जायला दोन रस्ते होते, पण ढोर गल्लीतून जाण्यात अडचणी यायच्या. तिथली पोरं फार डेंजर होती. तो भांडणाचा एरिया होता, त्यामुळे तिकडून जायचं नाही, असं सगळे सांगायचे. पण मी तिथूनच जायचे, मला तिथूनच जायला आवडायचं.”

“तो अल्पसंख्याक असल्याचं लग्नानंतर जाणवलं”, मराठमोळ्या रसिका आगाशेचं पती झीशानबद्दल भाष्य; म्हणाली, “मी त्याला…”

पुढे माधुरी म्हणाली, “एकदा मी तिथून जात होते आणि एका मुलाने शिट्टी मारली. मी त्याला विचारलं की शिट्टी कोणी मारली, तर ते म्हणाले, ‘आम्ही नाही मारली तुला आवाज आला असेल.’ मग मी कौतुक केलं, खूप छान शिट्टी मारली वगैरे. तो रक्षाबंधनचा दिवस होता, मी कौतुक केल्यावर एक मुलगा समोर आला आणि त्याने शिट्टी मारल्याची कबुली दिली. मग मी माझ्या बॅगेतून राखी काढली आणि त्याच्या हातावर बांधली. शिवाय मी त्याला म्हटलं की आता दरवर्षी माझ्या घरी राखीला यायचं. त्यानंतर जवळपास ७-८ वर्षे तो रक्षाबंधनाला घरी यायचा.”

आता त्या मुलाशी संपर्क नाही, पण ती एक आठवण आहे असं माधुरीने सांगितलं. दरम्यान, माधुरीने ‘रानबाजार’ व्यतिरिक्त ‘देव माणूस’ व ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress madhuri pawar tied rakhi to boy after he whistled hrc
Show comments