सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे मानसी अधिक प्रकाशझोतात आली. तिनं अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच मानसीनं याच वर्षी ‘सिफर’ नावाच्या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा पदार्पण केलं. अशा या चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीनं नुकताच कंगनाच्या रणौतच्या गाण्यावरील एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा – ‘बापल्योक’मधील ‘उमगाया बाप रं’ गाण्यात ‘तो’ शब्द आला अन् अजय गोगावले…; संगीतकार किस्सा सांगत म्हणाले…
मानसी मराठी सिनेसृष्टीपासून थोडी दूर असली तरी सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात असते. नेहमी नवनवीन व्हिडीओ फोटो शेअर करत असते. अनेकदा ती यामुळे ट्रोलिंगच्या जाळ्यात अडकते. मात्र ती ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देते.
तिनं नुकताच बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री कंगना रणौतच्या गाण्यावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मानसी कंगनाच्या ‘क्वीन’ चित्रपटातील ‘हंगामा हो गया’ या गाण्यावर डान्स करताना दिसतं आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिनं लिहिलं आहे की, “मानसी नाईक आणि क्वीन चित्रपटातील रानी. लवकरच बीटीएस…. मी संपूर्ण सृष्टीची आभारी आहे. मी हार मानणार नाही. नव्यानं उभी राहून भविष्याच्या दिशेनं प्रकाशमय वाटचाल करेन.” असं छान कॅप्शन तिनं दिलं असलं तरी या व्हिडीओमधील तिचा डान्स काही नेटकऱ्यांना खटकला.
हेही वाचा – स्पृहा जोशीनं फक्त एक दिवस केलेलं ‘हे’ काम; म्हणाली, “त्या दिवशी माझा सगळा माज उतरला”
हेही वाचा – “नाश्ता होईपर्यंत अचानक…”, दिग्पाल लांजेकरांना चाहत्यानं दिलं सरप्राइज; अनुभव सांगत म्हणाले…
एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “तू असे व्हिडीओ नको बनवू. तुझ्या स्टेट्सला शोभत नाही.” तर दुसऱ्या नेटकरीनं लिहिलं आहे की, “तू असा व्हिडीओ नको बनवू. तुझे रील चांगले असतात. हा डान्स तुला चांगला दिसतं नाही.” तर तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “क्या बात है. तू वाट लावली.”
हेही वाचा – “माझ्या कुटुंबात मी फक्त एकटाच देसाई आहे”; मंगेश देसाई यांनी सांगितलं आडनावामागचं रहस्य; म्हणाले…
दरम्यान, मानसी फक्त सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते असं नाही. पण गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळामुळेही चर्चेत असते. नुकत्याच एका मुलाखतीमधून मानसीनं घटस्फोट घेण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. तसेच तिला कशाप्रकारे फसवलं गेलं, याबद्दलही ती मोकळेपणानं बोलली आहे.