आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून मानसी नाईक तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केले होते. मानसी नाईक सोशल मीडियावर सतत रील व्हिडीओ शेअर करत असते. मानसीने नुकताच इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने दिलेल्या कॅप्शनमुळे ती चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- पावसाळ्यात निवेदिता सराफ यांना करायला आवडतं ‘हे’ काम; म्हणाल्या, “पहाटे पाच वाजता उठून…”

व्हिडीओमध्ये मानसी नाईक बॉलिवूडमधील एका जुन्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत तिने लिहिलं आहे. ‘धन्यवाद विश्व. मी हार मानणार नाही’ असं लिहिलं आहे. या कॅप्शनची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

मानसीची ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ ही गाणी तुफान गाजली. त्यामुळे मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे. दरम्यान मानसी नाईकने १९ जानेवारी २०२१ रोजी प्रदिप खरेरा याच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांच्याही नात्यात दुरावा आला.