मराठी लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. मानसीने अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर नवीन घर खरेदी केलं आहे. मानसीने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या घराची एक झलक दाखवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानसी नाईक ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. मानसीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात ती तिच्या नव्या घरात उभी असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : Video : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मानसी नाईकने खरेदी केले नवीन घर, म्हणाली “या रखरखीच्या जगण्यात वावरताना…”

मानसी नाईकची पोस्ट

“स्वत:च्या स्वार्थासाठी परमार्थ करत आहे. नवे रस्ते शोधण्यासाठी जुन्या वाटेने जात आहे.
विश्वासाने विश्वास ठेवते कुणावर,अविश्वासाने संशय घेते, त्यावर सत्याच्या वाटेने जाण्यासाठी असत्याची कास धरावी लागते,
खरं खोटं जाणण्यासाठी देवालाच हाक द्यावी लागते.
माझं सारं खरं खोटं देवालाच ठाऊक आहे.
म्हणूनच माझा त्याच्यावर विश्वास आहे.
भावनांचा विचार केला तर माझं मन एक दगड आहे, मनाच्या या दगडाला प्रामाणिकतेचा पैलू आहे.
प्रामाणिकपणे या दगडाला एक एक पैलू पडत आहे, हिरा होईल ना होईल या दगडाची किंमत वाढवत आहे.

आपण पुढे जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ते आपोआप होणार नाही. तुम्हाला स्वत:ला उठून म्हणावे लागेल, हे किती कठीण आहे, याची मला पर्वा नाही. मी किती निराश आहे, याची मला पर्वा नाही. मी माझ्याकडून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे जात आहे”, असे मानसीने म्हटले आहे.

आणखी वाचा : नव्या घरात गृहप्रवेश करताच मानसी नाईकने स्वत:च्या हाताने बनवला ‘हा’ पदार्थ, म्हणाली “कधी कधी मुली…”

दरम्यान मानसी नाईक अक्षय्य तृतीयाच्या शुभदिनी नवीन घर घेतल्याची गुडन्यूज दिली होती. मानसीने याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ती घराबाहेर कलशाची पूजा करताना दिसत आहे. तसेच ती नव्या घराच्या दरवाजावर ‘श्री’ असे लिहितानाही दिसत आहे. यानंतर ती पूजा करताना दिसली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress manasi naik share emotional post after buying new home instagram nrp