आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले. त्यातच आता मानसीच्या एका व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे रिल स्टारबरोबर व्हिडीओ बनवताना दिसत आहे. नुकतंच मानसीने प्रसिद्ध रिलस्टार तन्मय पाटेकरबरोबर रिल व्हिडीओ केला आहे. त्यांनी या व्हिडीओला दिलेल्या बॅकग्राऊंड गाणी आणि कॅप्शनमुळे हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
आणखी वाचा : “खोटंनाटं उलटंपालटं बोलून वागून…” मानसी नाईकने पहिल्यांदाच घटस्फोटाबद्दल केले भाष्य, पोस्ट चर्चेत

मानसी आणि तन्मयने एक रोमँटिक व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओत मानसी ही त्याला मुलींना मिठीत कसं घ्यायचं याचं प्रशिक्षण देताना दिसत आहे. यानंतर तन्मय हा तिला प्रत्यक्षात फिल्मी अंदाजात ते करुन दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी त्यांनी बॅकग्राऊंडला ‘मला वेड लागले प्रेमाचे’ हे गाण लावल्याचे पाहायला मिळत आहे. तुमच्या मागणीनुसार आम्ही एकत्र रिल केला. आम्हाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का? असा प्रश्न तन्मयने या कॅप्शनमध्ये विचारला आहे.

तन्मय आणि मानसीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. या व्हिडीओवर एकाने “नशिब काढलंस पोरा” अशी कमेंट केली आहे. तर एकाने “ही जोडी आयुष्यभर जर साथ राहिली तर खूप चांगलं होईल”, असे कमेंट करत म्हटले आहे. “भविष्यात भारतातील मराठी चित्रपट निर्माते तू असणार आहेस मित्रा, पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा”, अशी कमेंट एकाने केली आहे.

आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितलेले नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याचे कारण

दरम्यान मानसी नाईक ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. ती कायमच तिच्या खासगी, वैवाहिक आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दलच्या पोस्ट शेअर करताना दिसते. तसेच ती अनेक रिल्सही बनवताना पाहायला मिळते.

Story img Loader