आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना दिसते. नुकतंच तिने एका दिग्दर्शकाचा किस्सा सांगितला आहे.

मानसी नाईकने नुकतंच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यासह प्रोफेशनल आयुष्याबद्दल भाष्य केले. यावेळी ती म्हणाली, “रील्स करणे हे माझ्यासाठी ऑडिशन आहे, असंच मी समजते. मी खरंच तुम्हाला सांगते, रील्स करणं हा लोकांना टाईमपास वाटतो. मला काहीच काम नाही, रील्स करायचं म्हणून मी तयार होते. पण असं काहीही नाही. माझ्यासाठी ती एक ऑडिशन असते. मला जे लोक पाहतात, त्यांच्या सर्वांसाठी मी ते करते.”
आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”

Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना
mamta kulkarni is single says left vicky goswami
प्रेमामुळे करिअर संपलं, देशही सोडावा लागला; २५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी म्हणाली, “मी लग्न केलंच नाही”
Priyadarshini Indalkar
“त्या स्कीटनंतर इतकं हसं झालं”, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील किस्सा; म्हणाली…
eknath shinde accept Deputy CM role,
फडणवीसांना माझ्या अनुभवाचा फायदा ; नवे उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दावा
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “माझ्याकडे खूप अनुभव, तरीही यावेळी प्रेशर अनुभवतोय”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

“मी अजूनही ऑडिशन देते, पण ते रील्सद्वारे देते. कारण माझे ऑडिशन तसेही सुरुच आहेत. आपण विविध भाषेतही काम करतो. रील्सच्या १५, ३०, ६० सेकंदात आपण खूप काही गोष्टी दाखवू शकतो. माझे व्हिडीओ एका भाषेतील नसतात. मी मराठी, तामिळ, तेलुगू या सर्व भाषेत व्हिडीओ करते. त्याबरोबर लिपसिंकही करते. हे एक ऑडिशन आहे. मला त्यात कोणतीही लाज वाटत नाही.

मला एकदा एक मोठा दिग्दर्शक म्हणाला होता की, तू अजूनही रील्स का करते? तू इतकी मोठी अभिनेत्री आहेस? त्यावेळी मी त्या दिग्दर्शकाला सांगितलं की, मी मोठी नाही आणि दुसरं म्हणजे मला अजून चित्रपट मिळत नाही, म्हणून मी रील्स करते. मला याची खंत वाटते. याबद्दल कधीकधी वाईटही वाटतं. पण माझ्यासाठी मी लहान कलाकार आहे. मला अजून मोठं व्हायचं आहे”, असेही मानसीने यावेळी सांगितले.

आणखी वाचा : “मला आई व्हायचे होते”, मानसी नाईकने सांगितलं लग्न करण्यामागचं खरं कारण, म्हणाली “मी ग्लॅमरस…”

दरम्यान मानसी नाईक ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती इन्स्टाग्रामवर कायमच रील व्हिडीओ करताना दिसते. मानसीने अक्षय्य तृतीयाच्या शुभदिनी नवीन घर घेतल्याची गुडन्यूज दिली होती. तिने मानसीने एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ती घराबाहेर कलशाची पूजा करताना दिसत आहे. तसेच ती नव्या घराच्या दरवाजावर ‘श्री’ असे लिहितानाही दिसत आहे. यानंतर ती पूजा करताना दिसली होती.

Story img Loader