आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी नाईकने तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर आता मानसीने लग्न का केलं? त्यामागचे कारण काय? याबद्दल भाष्य केले आहे.
नुकतंच मानसीने अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले. यावेळी तिने तिचं लग्न, घटस्फोट आणि इतर अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला.
आणखी वाचा : “मला सकाळीच कोणीतरी…”, मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “वाढदिवसाच्या निमित्ताने…”
“प्रत्येक मुलीच्या बकेट लिस्टमधील इच्छा असते की लग्न करावं, कुटुंब असावं. मी लग्नानंतर बांगड्या, भांगेत कुंकू या सर्व गोष्टी मी प्रेमाने केल्या. लग्नसंस्था, सप्तपदी, मेहंदी यांसारख्या जे अनादर करतात. त्याचा माजही दाखवतात जा केलं तर काय, असंही म्हणतात. पण आता मी त्यातून बाहेर पडलीय. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.
मला लग्न करायचं होतं. माझं कुटुंब असावं वैगरे असं मला वाटतं होतं. पण खरंतर रीलपुरतंच हा प्रवास होता. फक्त मीडिया, प्रसिद्धी या गोष्टींसाठी हे सर्व होतं. मला जे काही सांगण्यात आलं, त्यातील एकही गोष्ट खरी नव्हती. मला नेहमीच एक सून म्हणून, बायको म्हणून मला माझं कुटुंब हवं होतं. ते स्वप्न माझं अपुरं राहिलं आहे. पण मी आता ते मी नक्कीच पूर्ण करेन. कारण माझा प्रेमावरचा विश्वास उडालेला नाही. मी ग्लॅमरस दिसत असले तरी माझे पाय जमिनीवर आहेत. मी जर माझ्या अंगी एखादी गोष्ट आणली तरच मी माझ्या मुलांना ते शिकवू शकेन. मला आईदेखील व्हायचं होतं, म्हणूनच मी रडले”, असे मानसी नाईक म्हणाली.
आणखी वाचा : “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन
दरम्यान मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असायचे. ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले. त्यानंतर मानसीने एका मुलाखतीत तिने घटस्फोटाबद्दलची माहिती दिली होती.