‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून अभिनेत्री मानसी नाईकने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. कामामुळे सतत चर्चेत असणारी मानसी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे सध्या अडचणीत आली आहे. काही दिवसांपूर्वी मानसीने तिचे आणि पती प्रदीप खरेराबरोबरचे एकत्र फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे डिलीट केले. त्यामुळे या दोघांचा लवकर घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अशातच आता मानसीच्या पतीचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
आणखी वाचा – भावाच्या लग्नात प्राजक्ता माळीचीच हवा, नव्या वहिनीचं केलं जोरदार स्वागत, फोटो शेअर करत म्हणाली…
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या मानसीने घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टद्वारे तिने अप्रत्यक्षपणे आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. तसेच माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणत्याही अफवा पसरवू नका अशी विनंतीही मानसीने केली.
घटस्फोटाच्या चर्चा होत असताना मानसीचा नवरा प्रदीपने मात्र याबाबत मौन कायम राखलं आहे. प्रदीपने आता त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पबमध्ये पार्टी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका हिंदी गाण्यावर नाचतानाही दिसत आहे.
“तुमको प्यार करते है” असं त्याने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. तसेच याच गाण्यावर तो थिरकताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. त्याच्या या व्हिडीओवरून खरंच मानसी व त्याच्यामध्ये काही बिनसलं आहे का? हा प्रश्न निर्माण होत आहे.