मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही महिन्यांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती प्रदीप खरेरापासून लवकरच ती घटस्फोट घेणार आहे. सध्या मानसी व प्रदीपच्या घटस्फोटाची अधिकृत प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान दोघंही सोशल मीडियाद्वारे त्यांच्या मनातील भावना व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच मानसीने शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – आठ वर्षांचा संसार, पहिल्या पत्नीशी घटस्फोट, एक मुलगी अन्…; नवीन ‘तारक मेहता’ने थाटामाटात केलं दुसरं लग्न, फोटो व्हायरल

shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Devendra Fadnavis Eknath Shinde ajit pawar (1)
एकनाथ शिंदे की अजित पवार, अधिक विश्वासू सहकारी कोण? देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक उत्तर
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
Santosh Deshmukh Murder Case
Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
_UK grooming scandal
हजारो मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणावरुन एलॉन मस्कने ब्रिटनच्या पंतप्रधानांना का केलं लक्ष्य?

मानसीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने साडी परिधान केली आहे. तर हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा आहे. मानसीने समुद्रकिनारी साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे. हे फोटो शेअर करत असताना तिने खास कॅप्शनही दिलं आहे.

मानसी म्हणाली, “नाही. माझ्या आयुष्याची ही नवी सुरुवात नाही. ही नव्या पुस्तकाची सुरुवात आहे. पहिलं पुस्तक कधीच बंद केलं आहे आणि समुद्रात फेकलं आहे. आता मी हे नवीन पुस्तक उघडलं आहे. नुकतीच सुरुवात झाली आहे”. मानसीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – अशी दिसते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लेक, खास पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दिविजा तुला…”

मानसीच्या या फोटोंवर लाईक व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तर अनेकांनी तुझा नवरा तुझ्याबरोबर दिसत नाही अशाही कमेंट केल्या आहेत. मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांनी जानेवारी २०२१मध्ये लग्नगाठ बांधली. सुरुवातीला त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. लग्नाच्या अवघ्या दीड वर्षातच मानसीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader