आपल्या आवडत्या कलाकारांना दुखापत झाली, प्रकृती बिघडली किंवा एखादा अपघात झाला की, चाहते चिंतेत असतात. असंच काहीसं अभिनेत्री मीरा जोशीच्या बाबतीत घडलं. मीराचा मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला. या अपघातामधून मीरा सुखरुप बाहेर पडली. मात्र तिच्या कारचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं. तिने कारचा व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली होती. आता तिने शेअर केलेली आणखी एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
‘अगंबाई अरेच्चा २’ फेम अभिनेत्रीने कार अपघात झाला असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं. त्यानंतर चाहतेही चिंतेत पडले होते. मात्र मीरा या अपघातामधून सुखरुप बचावली. आता तिने कारबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. स्वतःच्या कारला कायमचं सोडून जाताना मीराला दुःख होत आहे.
आणखी वाचा – “देखणा पैलवान माझ्या आयुष्यात होता पण…” सई ताम्हणकरने अफेअरबाबत केला होता खुलासा, म्हणालेली, “आम्ही अजूनही…”
कारबरोरचा फोटो शेअर करत मीरा म्हणाली, “निरोप देणं नेहमीच कठीण असतं”. मीराने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा चेहरा उदास दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये ती भावुक झालेली दिसत आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. तसेच मीराला काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.
कार अपघातानंतर शेअर केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून मीराने म्हटलं होतं की, “प्रिय सखी, किती आणि कुठे-कुठे भटकलो ना आपण… रात्रं-दिवस, ऊन-वारा, पाऊस, चढ-उतार काहीही असो आपण एकमेकींची काळजी घेतली. पण आज इतका भीषण अपघात होऊनही तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि मला किरकोळ ओरखडाही येऊ दिला नाही”. यामधूनच मीराचं तिच्या कारवर असणारं प्रेम दिसून आलं.