‘अगंबाई अरेच्चा २’ फेम मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीचा अपघात झाला आहे. मीराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत अपघात झाल्याची माहिती दिली. तिच्या या व्हिडीओमध्ये कार चक्काचूर झाली आहे. भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे, पण मीरा सुखरुप बचावली आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने पोहोचला कोकणातील गावी, त्याचं टुमदार कौलारू घर पाहिलंत का?

मीराने ‘क्रॅश्ड अँड मिसिंग’ असं कॅप्शन देत व्हिडीओ शेअर केला आहे. कारचा सखी असा उल्लेख करत ती व्हिडीओमध्ये म्हणाली, “प्रिय सखी, किती आणि कुठे-कुठे भटकलो ना आपण. रात्र-दिवस, ऊन-वारा, पाऊस चढ उतार काहीही असो आपण एकमेकींची काळजी घेतली. पण आज इतका भीषण अपघात होऊनही तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि मला किरकोळ ओरखडाही जेऊ दिला नाहीस. थँक्यू. प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. तब्बल ९० हजार मैलांचा आपला प्रवास. गमावलं ना मी तुला. आता विश्रांती घे.”

मीराच्या पोस्टनुसार तिचा मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला. या अपघातात तिच्या गाडीचं खूप नुकसान झालंय आणि ती बचावली आहे. अपघातात बचावलेल्या मीराने गाडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पोस्ट केली आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करून तिच्या प्रकृतीबद्दल विचारत आहेत. तसेच तिला काळजी घेण्यास सांगत आहेत.

Story img Loader