बॉलीवूडची कॉन्ट्रोवर्सी क्वीन अशी ओळख असलेली कंगना रणौतने आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे. भाजपाच्या तिकिटावर कंगना लोकसभा निवडणूक लढणार आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून कंगना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्यामुळे कंगना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अशातच कंगनाच्या समर्थनार्थ एका मराठी अभिनेत्रीने पोस्ट केली आहे; जी चांगलीच व्हायरल झाली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी पाचवी यादी जाहीर केली. या यादीत ‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका करुन घराघरांत पोहोचलेले अरुण गोविल यांच्यासह कंगना रणौतचं नाव होतं. अरुण यांना मेरठ येथील तिकीट मिळालं तर कंगनाला तिचं जन्मस्थळ मंडी येथील तिकीट मिळालं. याचा आनंद व्यक्त करत एका मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
हेही वाचा – “आपला कोकण भारी आसा…”, मुग्धा वैशंपायन पहिल्यांदाच गेली काजूच्या बागेत, पोस्ट करत म्हणाली…
अभिनय क्षेत्रासह राजकारणात सक्रिय असणारी अभिनेत्री मेघा धाडेने कंगनाला लोकसभा निवडणुकीचं तिकिट मिळताच सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. मेघाने इन्स्टाग्राम स्टोरीवर कंगनाची बातमी शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच “विजयी भव” असा हॅशटॅग लिहिला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी जून महिन्यात मेघा धाडेने भाजपात प्रवेश केला होता. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिने भाजपाचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये मेघाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. सध्या ती महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष आहे.