मराठी सिनेसृष्टीतील ‘हास्यसम्राट’ अशी ओळख असणारे सर्वांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी फक्त चित्रपटसृष्टीच नाही तर रंगभूमीही गाजवली. त्यांच्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने रसिकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं. मराठी सिनेसृष्टीत जवळपास दोन दशकं अक्षरशः लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावाने धुमाकूळ घातला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा काल ६९वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. यानिमित्ताने अभिनेत्री मेघा घाडगेने एक पोस्ट शेअर केली आहे.

मेघा घाडगेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने पछाडलेला या चित्रपटाचा एक फोटो शेअर केला आहे. यात चित्रपटाची संपूर्ण टीम पाहायला मिळत आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “तेजस्विनी पंडित स्वाभिमानी, सोनाली कुलकर्णी उत्तम अभिनेत्री, तर सई ताम्हणकर…”; सिद्धार्थ जाधवचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

मेघा घाडगेची पोस्ट

“आयुष्यात काही योगायोग फार विचित्र असतात…

आज लक्ष्या मामांचा बर्थडे! खरंतर आजही, जवळजवळ १९ वर्षानंतर वाटत राहतं, अचानक लक्ष्या मामांचा फोन येईल आणि ते ओरडून म्हणतील, “महेशला (महेश कोठारे) कॉल कर आत्ताच्या आत्ता..” माझ्या आयुष्यातला पहिला रिलिज्ड सिनेमा आणि ‘द लक्ष्मीकांत बेर्डे’ यांचा शेवटचा रिलिज्ड सिनेमा एकच असणं याचं शल्य काय असू शकतं, याची कल्पना कुणालाही असण्याची शक्यता नाही.

लहानपणी ज्यांचं कॉमेडी टायमिंग पाहून मी मोठे झाले, ज्यांचं इम्प्रोव्हायजेशन आजही अचाट करणारे वाटतात आणि मुळात ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला आणि भारताला खळखळून हसवलं त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव हा, कलेच्या प्रांगणातला एक समृद्ध अनुभव होता.

हॅप्पी बर्थडे लक्ष्या मामा! We all miss you… तुमच्या अजरामर कामांतून, कलाकृतींमधून, अफाट परफॉर्मन्स मधून तुम्ही आजही आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात Alive आहात!”, अशी पोस्ट मेघा घाडगेने केली आहे.

आणखी वाचा : “मी त्यांची माफी मागतो आणि…”, लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनय बेर्डेचे स्पष्टीकरण, म्हणाला…

दरम्यान ‘पछाडलेला’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, श्रेयस तळपदे, विजय चव्हाण, मेघा घाडगे, निलम शिर्के, नीना कुळकर्णी यांसारखी तगडी स्टारकास्ट झळकली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले होते.

Story img Loader