प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टका’तील पाचवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘सुभेदार’ असे या चित्रपटाचे नाव असून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता विराजस कुलकर्णी हा जिवा ही भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेची झलकही समोर आली आहे.
विराजस कुलकर्णी हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच विराजसने इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी त्याला एका चाहत्याने तू चित्रपटात मुख्य भूमिकेत कधी झळकणार? असा प्रश्न विचारला.
आणखी वाचा : “तुझा आणि शिवानीचा जुना फोटो पाठवं?” चाहत्याच्या मागणीवर विराजस कुलकर्णी म्हणाला…
यावर विराजसने “त्यासाठी अजून खूप कष्ट घ्यायचे आहेत… अनुभव कमवायचा आहे”, असे म्हटले. त्याच्या या उत्तराने सर्वांचीच मनं जिंकली.
![virajas kulkarni](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/08/virajas.jpeg?w=325)
दरम्यान विराजसने २०१८ मध्ये ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तो ‘माधुरी’ या चित्रपटात झळकला. मात्र त्याला खरी प्रसिद्धी ‘माझा होशील ना’ या मालिकेद्वारे मिळाली. सध्या तो ‘सुभेदार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात तो जिवा ही भूमिका साकारत आहे.