दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘श्री शिवराज अष्टका’मधील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट असून २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी चित्रपटातील कलाकार मंडळींचा लूक चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. नुकताच अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा ‘सुभेदार’ चित्रपटातील लूक समोर आला आहे.

हेही वाचा – क्षिती जोगचं फेसबुक पेज हॅक; अकाउंटवरून अश्लील व्हिडीओ झाले शेअर, अभिनेत्री म्हणाली…

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटातील मृण्मयी देशपांडेचा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘हात बांधून लई मर्द बनतुया? ह.. हात सोड! मग तुला नाय मुघलांच्या सात पिढ्यांना दावते.. मराठ्यांना नडायचा नतीजा काय असतुया’ असं लिहीत दिग्पाल यांनी मृण्मयीचा चित्रपटातील पहिल्या लूकचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – “…म्हणून मी भाजपामध्ये प्रवेश केला”; प्रिया बेर्डेंनी सांगितलं राष्ट्रवादी सोडण्याचं कारण; म्हणाल्या, “मी घुसमट…”

या फोटोमध्ये मृण्मयीच्या डोक्यावर पदर, हळदीनं भरलेला मळवट अन् त्यावर मोठं कुंकू, नाकात नथ आणि गळ्यात कवड्याची माळ पाहायला मिळत आहे. ‘सुभेदार’ या चित्रपटात मृण्मयी केशर या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा – अभिनेता सुयश टिळक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकला

यापूर्वी अभिनेता विराजस कुलकर्णीचा ‘सुभेदार’ चित्रपटातील लूक चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटात तो जीवा या भूमिकेत दिसणार आहे. ‘सुभेदार’मध्ये मुख्य भूमिका म्हणजेच तानाजी मालुसरेंची भूमिका अभिनेता अजय पुरकरनं साकारली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत पुन्हा चिन्मय मांडलेकर दिसणार आहे. तर जिजाऊ आईसाहेबांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – ‘तुम्ही तुमचं खरं नाव का लावत नाही?’ चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या…

दरम्यान, हा चित्रपट १८ ऑगस्टला म्हणजेच काल प्रदर्शित होणार होता. पण तांत्रिक अडचणीमुळे ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून २५ ऑगस्ट करण्यात आली.

Story img Loader