एखादी लोकप्रिय अभिनेत्री कसं आयुष्य जगत असेल? असा प्रश्न कोणीही आपल्याला विचारला, तर डिझायनर कपडे, महागड्या वस्तू, आलिशान घर, कायम तिच्या मदतीला असणारे दोन-तीन सहकारी असं चित्र सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण, मराठी कलाविश्वातील बऱ्याच अभिनेत्री याला अपवाद ठरल्या आहेत. यापैकी एक अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे. मृण्मयीने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. परंतु सध्या ती वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृण्मयी सध्या मुंबई सोडून महाबळेश्वरमध्ये तिच्या नवऱ्याबरोबर राहते. या जोडप्याने निसर्गाच्या सानिध्यात महाबळेश्वरमध्ये सुंदर असं घर बांधलं आहे. याच ठिकाणी दोघांनी ‘नील अँड मोमो फार्म’ नावाचा व्यवसाय सुरू केला आहे. दोघेही शेतात एकत्र काम करून नैसर्गिक उत्पादनांच्या निर्मितीवर भर देत आहेत. २०२० पासून मृण्मयी मुंबई सोडून महाबळेश्वरला स्थायिक झाली. त्यांच्या शेतातील सुंदर फोटो व व्हिडीओ अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर करत असते. याठिकाणी शेतीबरोबरच ते दोघे नैसर्गिक साबणांची निर्मिती सुद्धा करतात.

हेही वाचा : “अशक्तपणा, ताप अन्…”, लग्नानंतर अमृता देशमुख पडली आजारी, अभिनेत्रीची आई म्हणाली, “जिद्दीने तिने…”

मृण्मयीने शेअर केलेल्या शेतीसंदर्भातील व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री स्ट्रॉबेरी लागवडीबाबत माहिती देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा नवरा स्वप्नील राव शेतात पेंढा गोळा करून नेत असताना मृण्मयी त्याला शेतीविषयक आणि स्ट्रॉबेरी लागवडीबद्दल अनेक प्रश्न विचारते. तसेच आमच्या नैसर्गिक स्ट्रॉबेरीज नक्की विकत घ्या…असं आवाहन अभिनेत्रीने या व्हिडीओच्या शेवटी तिच्या चाहत्यांना केलं आहे.

हेही वाचा : पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा! अभिनेत्रीचा होणारा नवरा नेमकं काय काम करतो? जाणून घ्या

दरम्यान, सुरुवातीला या स्ट्रॉबेरीजची विक्री फक्त पुण्यात करण्यात येईल असंही मृण्मयीने या व्हिडीओमध्ये सांगितलं. यावर काही नेटकऱ्यांनी तिला “मुंबईत सुद्धा ऑर्डर पाठवता आली तर बघ…फक्त पुण्यातचं नको” अशी विनंती केली आहे. तसेच इतर काही नेटकऱ्यांनी “सेंद्रिय शेती करणं कधीही उत्तम…सुंदर उपक्रम”, “तुम्ही दोघांनी मेहनतीने साकारलेला तुमचा व्याप बघायला खूप आवडेल!!” अशा कमेंट्स मृण्मयीच्या व्हिडीओवर करत तिचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress mrunmayee deshpande lives in mahabaleshwar with her husband swapnil rao and doing natural farming sva 00