कलाकार मंडळी नेमकं कसं आयुष्य जगतात? त्यांचं राहणीमान, त्यांची प्रत्येक महागडी वस्तू याबाबत जाणून घेण्यात चाहत्यांना अधिक रस असतो. सोशल मीडियावर सध्या अशाच एका मराठमोळ्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घराची जोरदार चर्चा रंगत आहे. ही अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. मृण्मयी सध्या महाबळेश्वरमध्ये राहत आहे. महाबळेश्वरमधील विविध फोटो व व्हिडीओ ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसते.
मृण्मयीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे ती तिचं महाबळेश्वरमधील घराची झलक दाखवताना दिसत आहे. शिवाय तिच्या घराच्या चारही बाजूंना असणारं निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखं आहे. पावसाळ्याचं आगमन झाल्याने या निसर्गसौंदर्यामध्ये अधिक भर पडली आहे.
मृण्मयीच्या या व्हिडीओमध्ये तिच्या घराची मोठी बाल्कनी दिसत आहे. तसेच घराच्या चारही बाजूंना धुक्याची चादर पसरली आहे. मृण्मयी पती स्वप्निलसह पावसाचा आनंद घेत आहे. शिवाय तिच्या बाल्कनीमध्ये बसण्यासाठी मोठी जागाही आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत घर फारच सुंदर असल्याचं म्हटलं आहे.
मृण्मयी व स्वप्निल घराशेजारीच शेतीही करतात. मध्यंतरी या दोघांनी पर्मा कल्चर (शेतीविषयक कोर्स) सुरु केला होता. या कोर्समध्ये अनेकांनी सहभागही घेतला होता. मृण्मयीने स्वतःचा एक नैसर्गिक ब्युटी ब्रँड सुरु केला आहे. महाबळेश्वरमधूनच ती या संपूर्ण ब्रँडच काम पाहते. निसर्गाच्या सानिध्यात सध्या ती स्वतःचा वेळ एण्जॉय करताना दिसत आहे.