बहुआयामी अभिनेत्री मुक्ता बर्वे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने स्वबळावर नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्राच वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या मुक्ताच रंगभूमीवर ‘चारचौघी’ हे नाटक जोरदार सुरू आहे. अशातच मुक्ताने प्रवासातला एक वाईट अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा – Video: दादा कोंडकेंच्या गाण्यावर अंशुमन विचारेचा बायकोबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
अभिनेत्री मुक्ता बर्वेने पोह्यांचा फोटो शेअर करून सांगितलं की, “माझा विश्वासच बसेना… खरं तर मी ‘श्री दत्त स्नॅक्स’ची फॅन आहे. मुंबई-पुणे करताना अनेकदा तिथे आवर्जून खाण्याचा ब्रेक घेते मी. आज नाशिकला जाताना पडघा टोलनंतर खूप कौतुकानी थांबले आणि पोहे मागवले. अत्यंत अनास्थेनी , गरम असल्याचा भास होईल एवढेच जेमतेम गरम पोहे त्यांनी दिले. आणि कमिटमेंट एवढी की पोहे म्हणजे फक्त पोहे. कांदा-मीठ आणि साखर बास!”
“जरा चव यावी म्हणून कदाचित शेंगदाणे, शेव, कोथिंबीर, गेलाबाजार लिंबू .. यातलं काहीच नाही. पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना समोरच्या डीशमध्ये कोणीतरी एवढी अनास्था वाढून दिली याचं वाईट वाटलं,” असं मुक्ताने लिहीलं आहे.
मुक्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्यानं लिहीलं आहे की, ‘पोस्ट वाचायच्या अगोदरच पोहे बघूनचं लक्षात आले ….अशा लोकांसाठी गरुडपुरणात वेगळी शिक्षा आहे..’ तर दुसऱ्या चाहत्यानं लिहीलं आहे की, ‘ग्राहक जास्त झाले की गुणवत्ता कमी होते’ तसेच तिसऱ्या चाहतीनं लिहीलं आहे की, ‘उपकार केल्या सारखे पोहे केलेत असं वाटतंय ते पाहून.’
हेही वाचा – Video: “ही पागल होत चालली आहे…” राखी सावंतच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा – एका शब्दामुळे गौरव मोरेला अडवलं होतं विमानतळावर; पार्थ भालेरावने सांगितला ‘तो’ किस्सा
दरम्यान, मुक्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिचं ‘चारचौघी’ या नाटकाव्यतिरिक्त “प्रिय भाई… एक कविता हवी आहे” या कार्यक्रमाचे प्रयोग देखील सुरू आहेत. तसेच लवकरच तिचा ‘रावसाहेब’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता.