प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत असतो. रात्रं-दिवस एक करून तो आपल्या भूमिकेची तयारी करत असतो. आपली भूमिका चांगली साकारण्यासाठी कलाकार जीवाचं रान करत असतात. दिवस-रात्र कशाचीही पर्वा न करता त्यांचं शूटिंग सुरूच असतं. अनेकांना तर झोपायला पुरेसा वेळही मिळत नसतो. शूटिंगदरम्यानच मिळालेल्या वेळेत ते झोप घेत असतात. एका मराठमोळ्या अभिनेत्रीने असाच एक फोटो शेअर केला आहे. शूटिंगवरून दमून भागून आलेली ही अभिनेत्री गाडीतच झोपली आहे.
हेही वाचा- “जिंकणं पाहिलं नाही; हरणं मात्र…” सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
रात्रीचं शूट केल्यानंतर ही अभिनेत्री एवढी थकली की, ती गाडीत बसल्या बसल्याच झोपून गेली. मात्र, गाडीत झोप मोड होऊ नये म्हणून तिने डोळ्याला पट्टी आणि डोक्याला स्कार्फ गुंडाळला आहे. या पट्टीवर आपण सगळे एक आहोत असं लिहिलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून मुक्ता बर्वे आहे. मुक्ताने सोशल मीडियावर याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने कॅप्शनही दिलं आहे. फोटो शेअर करत मुक्ताने लिहिलं, ‘रात्रीनंतरचा दिवस (शूट).’
मुक्ताचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंटही केल्या आहेत. काहींनी ‘डोळे बंद केले आहेस तर एखादी इच्छाही मागून घे’ अशी कमेंट केली आहे. तर एकाने तिला ‘आराम कर’ असा सल्ला दिला आहे.
हेही वाचा- प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाला प्रेक्षकांची पसंती, अवघ्या २ महिन्यांत दिली आनंदाची बातमी
मुक्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यातून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मुक्ता सध्या मराठीतील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. सध्या ती ‘चारचौघी’ या नाटकामध्ये दिसत आहे. तसेच तिचा ‘रावसाहेब’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे.