गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवर आधारित मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. ऐतिहासिक, सामाजिक, महिला केंद्रीत या विषयांसह आता विनोदी प्रेमकथेवर आधारित एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री नम्रता संभेराव ही सतत विविध कारणांनी चर्चेत असते. नुकतंच नम्रता संभेरावने ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट पाहिला. यानंतर तिने तिला हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “शालेय जीवन, प्रेम अन्…” सर्वोत्कृष्ट युथ फिल्म पुरस्कार मिळालेला ‘आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर प्रदर्शित

नम्रता संभेरावची पोस्ट

“चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहिला आणि काय भारी अनुभव प्रेक्षक relate करत होते scenes ना react करत होते. अतिशय गोड सिनेमा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत चेहऱ्यावर हसूच होतं, त्याची कारणं म्हणजे उत्तम कलाकार, उत्तम कलाकृती, उत्तम लेखन, उत्तम दिग्दर्शन, उत्तम चित्रीकरण, उत्तम नेपथ्य, उत्तम निर्मिती, एकूणच सगळं कमाल…

सिनेमा इतिहासात घेऊन गेला, शाळेतल्या आठवणी ताज्या झाल्या, 90 चा काळ काय कमाल उभा केलाय. बारीक सारीक detailing extra ordinary. आपल्या भूतकाळात काही काळ जर तुम्हाला सफर करायची असेल तर २ तास वेळ काढून ही सफर नक्की अनुभवा माझी खात्री आहे. तुम्हाला नक्की भारी वाटेल”, असे नम्रता संभेरावने म्हटले आहे.

आणखी वाचा : “आई ही अमेरिका नाही…” इंग्रजीत बोलणाऱ्या नम्रता संभेरावला लेकाने दिला मोलाचा सल्ला, म्हणाला “इंडियात इंग्रजी…”

दरम्यान ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress namrata sambherao share instagram post for aatmapamphlet movie review nrp
First published on: 08-10-2023 at 09:22 IST