प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांना आपल्या अभिनयाने सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. चित्रपट हिंदी असो वा मराठी नाना पाटेकर यांचा अभिनय नेहमीच लक्षात ठेवण्यासारखा असतो. नाना पाटेकर हे उत्तम अभिनेते असण्याबरोबरच त्यांना जेवण करण्याची विशेष आवड आहे. नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी नाना पाटेकरांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी नाना पाटेकरांच्या फार्म हाऊसची झलक दाखवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीना कुळकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्या भक्ती आचरेकर आणि नाना पाटेकर यांच्याबरोबर फार्म हाऊसची सफर करताना दिसत आहे. यावेळी नानांनी बनवलेलं जेवण, केलेली उठाबस आणि फार्म हाऊसमध्ये असलेल्या विविध गोष्टीही दाखवल्या आहेत.
आणखी वाचा : Video : करंदी, काळं चिकन अन् सोलकढी; सत्या मांजरेकरच्या हॉटेलमधून नीना कुळकर्णींनी ऑर्डर केलं जेवण, म्हणाल्या “पदार्थांची चव…”

नीना कुळकर्णींची पोस्ट

“ये सालों की दोस्ती का मज़बूत जोड़ है..छूटेगा नहीं

१९७८ साली रंगमंचावर हमीदाबाईची कोठी हया नाटकाच्या निमित्ताने एकत्र आलो… विजया मेहतांच्या तालमीत तयार होता होता, हमिदाबाई ची कोठी, महासागर अश्या अविस्मरणीय नाटकांचे प्रयोग करता करता, सहकलाकारांचे मित्र झालो. सुखदुःखात साथ देत,भांडत ,हसत मस्तीत जगलो. होता होता आपआपल्या पाऊलवाटा शोधल्या. पण नाती सुटली नाहीत.. संबंध तुटले नाहीत.

आज ४५ हून अधिक वर्ष लोटली आहेत. तरीही स्नेह तसाच आहे, मैत्री वाढली आहे. मागील पानावरून पुढे! गप्पा, विनोद, चर्चा, प्रयोगातल्या आठवणींनी, दिवस रात्र अपुरे पडले! स्वतःच्या हातांने करुन वाढलेलं सुग्रास जेवण, नाना आणि त्याच्या परिवारा चं अगत्य, नानाच्या वाडीतली सुबत्ता… मन तृप्त झालं”, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : “तुम्ही त्याच मार्गाने…” तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट चर्चेत

नीना कुळकर्णींनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेत्री ईशा केसकरने या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. तर अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी “किती छान मैत्री” अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress neena kulkarni visit nana patekar farmhouse share video with some photos nrp