मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने सिनेसृष्टीत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. तिने मराठीसह अनेक हिंदी मालिका, चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र तरीही ती कायमच विविध कारणांनी र्चेत असते. नेहा पेंडसे ही शार्दुल सिंग बायसबरोबर २०२० मध्ये विवाहबंधनात अडकली. नेहा सोशल मीडियावरसुद्धा चांगलीच सक्रिय असते.

मध्यंतरी तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आणि लग्नानंतर झालेल्या बदलाविषयी भाष्य केलं होतं. आता नुकतंच एका मुलाखतीदरम्यान नेहाने मातृत्वाबद्दल भाष्य केलं आहे. इतकंच नव्हे तर नेहा पेंडसेने तिची बीजांडे गोठवली (Eggs Freeze) असल्याचा खुलासाही या मुलाखतीमध्ये केला.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…

आणखी वाचा : “मी आजही शाहरुखसाठी गाऊ शकतो, पण…” सोनू निगमने व्यक्त केली मनातील खंत

नेहाने नुकतंच ‘मे आय कम इन मॅडम’च्या दुसऱ्या सीझनमधून पुन्हा टेलिव्हिजनवर कमबॅक केला आहे. यानिमित्ताने ‘ई-टाइम्स’शी संवाद साधताना नेहा म्हणाली, “लग्न झाल्यापासून वर्षभराच्या आतच मातृत्वाची भावना किंवा आपण आई व्हायला हवी अशी भावना माझ्या मनात यायला लागली. जिला कधीच आई व्हायचं नव्हतं तिच्या मनात अशा भावना येत आहेत ही गोष्ट माझ्या आकलना पलिकडची होती. त्यानंतर मी यावर गांभीर्याने विचार केला कारण एक मूल सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे.”

पुढे नेहा याविषयी म्हणाली, “मी यावर पूर्णपणे विचार केला अन् मी माझी बीजांडे गोठवण्याचा (Eggs Freeze) निर्णय घेतला. आई व्हायची माझी इच्छा आहे पण आत्ता मला ते शक्य नाही. माझ्या नवऱ्याने मला हा सल्ला दिला. कदाचित मी आई होईन किंवा नाही होणार, कारण माझ्या मनातही याबद्दल बऱ्याच शंका कुशंका आहेत. मला कुणावरही अवलंबून राहायचं नाही. मी स्वतःला सुपरवुमन अजिबात मानत नाही, कारण घर सांभाळणं आणि काम करणं या दोन्हीसाठी लागणारी लागणारी ताकद माझ्यात नाही.”

नेहाने आपल्या कारकिर्दीची सुरवात बालकलाकार म्हणून केली आहे. ‘प्यार कोई खेल नही’ या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘दाग द फायर’, ‘देवदास’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच झी वाहिनीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेने तिला वेगळी ओळख निर्माण करून दिली.

Story img Loader