मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने सिनेसृष्टीत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. तिने मराठीसह अनेक हिंदी मालिका, चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र तरीही ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. नुकतंच तिने लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेहा पेंडसे ही शार्दुल सिंग बायसबरोबर २०२० मध्ये विवाहबंधनात अडकली. नुकतंच तिने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला लग्नानंतर वैयक्तिक आयुष्यात काय फरक पडला, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”

यावेळी ती म्हणाली, “लग्न हे कधीच गुलाबांच्या पाकळ्यांसारखे नसते. कोणतेही लग्न हे तडजोडीशिवाय टिकत नाही आणि लग्नानंतर तडजोड ही स्त्रियांनाच करावी लागते. माझं लग्न झाल्यानंतरही मीच तडजोड करते. तो काही करत नाही.”

“पण तुम्ही या तडजोडी तेव्हाच करु शकता, जेव्हा तुमचा समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो. तुमचे त्याच्यावर प्रेम असते. तुम्हाला त्याच्याबद्दल खात्री असते. जेव्हा तुम्ही समतोल राखता येतो तेव्हा एखाद्या स्त्रीला गोष्टी फार सोप्या होतात. मग त्यावेळी स्त्रियांना तडजोड करणं फार सोपं होतं. ठिक आहे तो सांभाळून घेतो ना, ठिक आहे ना तो करतो ना, असं ठिक आहे, ठिक आहे म्हणतच आमचा साडेतीन वर्षांचा संसार अजूनही सुरु आहे”, असे नेहा पेंडसेने सांगितले.

आणखी वाचा : आधी प्रेमाची कबुली, लगेच मेहंदी सोहळा अन्… स्वानंदी टिकेकरच्या साखरपुड्याचा शाही थाट, आई-वडिलांचीही दिसली झलक

दरम्यान नेहाने आपल्या कारकिर्दीची सुरवात बालकलाकार म्हणून केली आहे. ‘प्यार कोई खेल नही’ या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘दाग द फायर’, ‘देवदास’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच झी वाहिनीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेने तिला वेगळी ओळख निर्माण करून दिली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress neha pendse talk about compromise after marrying shardul singh bayas nrp