अभिनेत्री नेहा पेंडसेने मराठीसह हिंदी कलाविश्वातही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या नेहा मनोरंजन क्षेत्रापासून दूर असली तरीही, सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नेहा पेंडसेने २०२० मध्ये शार्दुल सिंहबरोबर लग्नगाठ बांधली. सध्या नेहा नवऱ्याबरोबर हॉटेल व्यवसायात सक्रिय आहे. याविषयी अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’च्या टीमसह केदार शिंदेंची लेक सनाने काढला ‘भारी’ सेल्फी, पोस्ट शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री नेहा पेंडसेने अलीकडेच ‘राजश्री मराठी’च्या ‘टूडेज स्पेशल’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी नेहाने वैवाहिक जीवनासह, नवऱ्याबरोबरची पहिली डेट कशी होती याविषयी भाष्य केले आहे. अभिनेत्री म्हणाली, “रिलेशनशिपच्या आधी मी आणि शार्दुल अनऑफिशियल डेटवर ताज हॉटेलमधील वसाबी रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. मला खूप वाईट सवय आहे की, मी कुठेही मांडी घालून जेवायला बसते. पंचतारांकित हॉटेल असलं तरीही मी मांडी घालून जेवते नाहीतर मला एकदम अवघडल्यासारखं वाटतं. “

हेही वाचा : सारा अली खानने खरेदी केलं नवं ऑफिस, किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, “जगाला सांगते…”

नेहा पुढे म्हणाली, “पहिल्यांदा मी शार्दुलला कामानिमित्त भेटायला गेले होते. कामामुळेच आम्ही एकमेकांच्या संपर्कात आलो. मग अशा मोठ्या हॉटेलमध्ये नीटनेटकं बसायचं, त्यात तिथे सगळे जापनीज पदार्थ होते…मला चॉपस्टिकही वापरता येत नव्हती. त्या दिवशी सगळाच गोंधळ झाला होता.”

हेही वाचा : इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीसाठी जुई गडकरीने घेतला पुढाकार, पोस्ट शेअर करत म्हणाली…

“नवऱ्याकडून मी जापनीज पदार्थ खायला-चॉपस्टिक वापरायला शिकले आणि कुठेही गेले तरी मांडी घालून जेवायला बसायचं हे मी त्याला शिकवलं. कारण, अशा मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन स्वत:च्या शैलीत जेवण्यासाठी एक वेगळा आत्मविश्वास लागतो. आता त्याने माझ्या सवयी न बदलता मी जशी आहे तसं मला स्वीकारलंय” असे हसत-हसत नेहाने सांगितलं.

Story img Loader