बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘झिम्मा’ चित्रपटाचा दुसरा भाग आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटानंतर ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘झिम्मा २’ हा चित्रपट कसा आहे, याबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या सूनेने हा चित्रपट कसा वाटला? याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
निर्मिती सावंत यांची सून पूर्वा पंडितने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने निर्मिती सावंत आणि अभिनय सावंत यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना तिने झिम्मा २ हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : Jhimma 2 Review: जीवाभावाच्या मैत्रिणींच्या रियुनियनची भावुक करणारी गोष्ट; वाचा कसा आहे ‘झिम्मा २’
पूर्वा पंडितची पोस्ट
“मी काल रात्री या विलक्षण स्त्रीमुळे एक उत्साहपूर्ण अनुभव घेऊ शकले, ज्या विलक्षण स्त्रीला मी अभिमानाने मम्मा म्हणते. मित्रांनो मी खरं सांगते, ‘झिम्मा २’ चित्रपटात माझी मम्मा पूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहे. माझे हे शब्द लक्षात ठेवा. इतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल मी ‘झिम्मा २’ च्या संपूर्ण टीमची अभिनेत्यांपासून ते अगदी सर्व तंत्रज्ञांचे आभार मानते. त्याबरोबरच ‘कॅप्टन ऑफ द शिप’ असलेल्या हेमंत ढोमेने इतका सुंदर चित्रटप बनवल्याबद्दल मी त्याची आभारी आहे.
मी चित्रपटांबद्दल सहसा बोलत नाही. पण या चित्रपटाने मला खूप भारावून टाकले आहे. मी काल रात्री हा चित्रपट पाहिल्यानंतर अजूनही त्यातून बाहेर पडू शकत नाही. मी फक्त इतकंच सांगेन की ‘झिम्मा २’ हा चित्रपट भारतीय सिनेमांचा स्तर उंचावेल. या चित्रपटाचा आशय, विषय हा आताच्या काळाशी संबंधित आणि प्रेमळ आहे. त्यामुळे लवकरात लवकर चित्रपटगृहात जाऊन ‘झिम्मा २’ पाहा”, अशी पोस्ट पूर्वा पंडितने केली आहे.
आणखी वाचा : Video : “…म्हणून ‘झिम्मा २’मध्ये सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले नाही”, हेमंत ढोमेने सांगितलं खरं कारण
दरम्यान पूर्वा पंडितच्या या पोस्टवर अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी कमेंट केली आहे. त्यांनी “माझं गं ते सोनू”, असं म्हणत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. त्याबरोबरच अभिनेत्री क्षिती जोग हिनेही हार्ट इमोजी शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.