मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील कॉमेडी क्वीन म्हणून निर्मिती सावंत यांना ओळखले जाते. निर्मिती सावंत यांनी विनोदी अभिनेत्री म्हणून लोकप्रियता मिळवली. त्याबरोबरच त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. निर्मिती सावंत यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय सावंतनेही सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याच्या कारकिर्दीला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनय सावंत हा सोशल मीडियावर सतत सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने त्याच्या करिअरमधील चित्रपट व मालिकांचे काही व्हिडीओ एकत्र केले आहेत. याला कॅप्शन देताना त्याने त्याच्या करिअरबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : शरद पोंक्षेच्या लेकीची गगनभरारी, लवकरच देशसेवेत रुजू होणार, म्हणाले “कोणतीही सवलत,आरक्षण नसताना…”

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर

अभिनय सावंतची पोस्ट

“प्रवास हा नेहमी सुरु असतो. १० वर्षांपूर्वी २६ जुलै २०१३ रोजी प्लाझा चित्रपटगृहात श्रीमंत दामादोर पंत या चित्रपटाद्वारे मी मोठ्या पडद्यावर झळकलो. त्यानंतर आज तब्बल १० वर्षांनी २६ जुलै २०२३ रोजी मी त्याच ठिकाणी (प्लाझा चित्रपटगृह) माझा नवीन चित्रपट हिराफेरीच्या ट्रेलर आणि म्युझिक लाँचला हजेरी लावली.

या दहा वर्षात मी अनेक ठिकाणी फिरलो आणि मला आयुष्यात अनेक लोकही भेटली. पण माझा ठाम विश्वास आहे की आपला प्रवास हा कायम सुरुच असतो आणि माझाही प्रवास नेहमी सुरु राहिल”, असे अभिनयने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “बारीक असणाऱ्या अभिनेत्री…” बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर निर्मिती सावंत यांनी मांडलेले स्पष्ट मत

दरम्यान अभिनय सावंतने केदार शिंदे दिग्दर्शित ‘श्रीमंत दामोदर पंत’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केले. त्यानंतर तो ‘अकल्पित’, ‘थापाड्या’ या चित्रपटात झळकला. याबरोबरच अभिनय ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं!’ या मालिकेतही झळकला होता. तसेच सध्या तो ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेत उदय आल्हादराव भालेकर हे पात्र साकारत आहे. तसेच लवकरच तो हिराफेरी या चित्रपटातही झळकणार आहे.

Story img Loader