मराठीतील बहुचर्चित चित्रपट ‘झिम्मा २’ आज (२४ नोव्हेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला आला. २०२१ साली या चित्रपटाचा पहिला भाग ‘झिम्मा’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. ‘झिम्मा’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर ‘झिम्मा २’ बाबत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुक्ता होती. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा- “हा सिनेमा आमचा राहिला नाही, आता तो…”, हेमंत ढोमेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
झिम्मा २ मध्ये सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू या कलाकारांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटातील निर्मिती सावंत यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. चित्रपटात रिंकू राजगुरु निर्मिती सावंत यांची सून दाखवली आहे. चित्रपटात या दोघी सतत एकमेकींना टोमणे मारत असतात. दरम्यान एका मुलाखतीत निर्मिती सावंत यांनी खऱ्या आयुष्यात त्यांच्या सूनबरोबर कसं नात आहे याबाबतचा खुलासा केला आहे.
निर्मिती सावंत म्हणाल्या, “आमच्या दोघींची सासू सूनेची जोडी जगावेगळी आहे. आम्ही दोघीही प्रचंड वेड्या आहोत. दोन वेड्या बायका एकत्र आल्यावर जो धिंगाणा असतो तोच आमच्या घरी होत असतो. बिचाऱ्या माझ्या मुलाला सगळं सहन करावं लागतं त्याला काही पर्याय नाहीये. कधी कधी हॉटेलमध्ये गेल्यावर आम्ही इतक्या जोरजोरात हसतो की अभिनय आम्हाला रागवतो. तर उलट आम्ही त्यालाच चिडवतो. कोणत्याही नात्यात मतभेद असू शकतात ते मनभेद होऊ नयेत याची काळजी आपण घेतली पाहिजे.”
हेही वाचा- “मी फक्त…”, ‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर निर्मिती सावंतच्या रिअल लाईफ सूनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…
दरम्यान नुकतंच निर्मिती सावंतच्या सूनेने ‘झिम्मा २’ हा चित्रपट कसा वाटला याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिने निर्मिती सावंत आणि अभिनय सावंत यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने झिम्मा २ चित्रपट बनवल्याबद्दल हेमंत ढोमेचे आभार मानले आहे. तसेच निर्मिती सावंत यांच्या अभिनयाचेही कौतुक केलं आहे.