मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार कलाकाराची जोडी म्हणून अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ यांच्याकडे पाहिले जाते. त्या दोघांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या जोडीला ऑनस्क्रीनसह ऑफस्क्रिनवरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. या दोघांची लव्हस्टोरी आणि लग्नाचा किस्सा त्याकाळात फार गाजला होता. नुकतंच निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्याबद्दल सांगितले.
निवेदिता सराफ यांनी नुकतंच ‘रेडिओ सिटी’ या चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना त्यांच्या आवडी-निवडीबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी फारच मनमोकळेपणाने उत्तर दिली.
आणखी वाचा : “माझा मित्रच कधी सासरा…” अशोक सराफ यांनी सांगितला बायकोच्या वडिलांना पहिल्यांदा भेटल्याचा किस्सा
यावेळी निवेदिता सराफ यांना “तुम्हाला काय खायला आवडतं?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी चिकन कबाब आणि सूप हे मला कधीही आवडतं, असे उत्तर दिले.
त्यानंतर निवेदिता सराफ यांना “अशोक मामा काय चांगलं बनवतात?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी “तुमचे अशोक मामा मला बनवतात”, असे मिश्किल उत्तर निवेदिता सराफ यांनी दिले. त्यांचे हे उत्तर ऐकून सर्वजण हसू लागले.
आणखी वाचा : “…त्यावेळी आम्ही मुलाला बिस्कीट पाण्यात बुडवून खायला दिलं होतं”, अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
दरम्यान अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयामध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे. अशोक सराफ आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती. निवेदिता जोशी आणि अशोक सराफ यांची मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेम जुळले. अशोक सराफ यांना त्यांनी प्रपोज देखील केलं. त्यानंतर त्या दोघांनी मंगेशी मंदिरात जाऊन साधेपणाने लग्नही केले.