पांडूरंग जाधव दिग्दर्शित ‘बाई गं’ चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील, सागर कारंडे अशी तगडी कलाकार मंडळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटातील गाणी सर्वत्र चर्चेत आहेत. ‘जंतर मंतर बाई गं’ असो किंवा ‘चांद थांबला’ असो प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री पूजा सावंत व तिची बहिणी रुचिरा सावंतने सुकन्या मोनेंबरोबर केलेला जबरदस्त डान्स चर्चेत आला आहे.

अभिनेत्री पूजा सावंतने ‘बाई गं’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देत ‘बाई गं’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पूजा सावंत, रुचिरा सावंत सुकन्या मोनेंबरोबर सुंदर डान्स करताना दिसत आहे. तिघी ‘बाई गं’ गाण्याची हूकस्टेप करताना पाहायला मिळत आहे. तिघींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
Reshma Shinde Dance Video
Video : रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईसह जबरदस्त डान्स! छत्तीसगढ़ी गाण्यावर धरला ठेका, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”

हेही वाचा – Video: “माझ्या पोटावर पाय देऊ नका…”, दिव्या अग्रवाल व तिच्या पतीवर दलालने लावला फसवणुकीचा आरोप, म्हणाला…

पूजा सावंत, रुचिरा सावंत आणि सुकन्या मोनेंच्या या व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री दिप्ती देवी, आशिष पाटील, मेघना एरंडे, नम्रता गायकवाड, किशोरी गोडबोले अशा बऱ्याच कलाकारांनी तिघींच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच “खूप छान”, “खरंतर या चित्रपटात पूजा सावंत तूच हवी होतीस”, “भारी”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील गाण्यासंदर्भात सचिन पिळगांवकरांनी दिली हिंट; ‘या’ लोकप्रिय गायकासह गायलं आहे गाणं

दरम्यान, पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लग्नानंतर तिच पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. पूजाच्या नव्या गाण्याचं नावं ‘नाच गो बया’ असून यामध्ये तिच्यासह अभिनेत्री अक्षया नाईक, आकांक्षा गाडे, आयुष संजीव, निक शिंदे आणि तश्वी भोईर झळकली आहे. सध्या पूजाचं हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होतं आहे. ५ जुलैला प्रदर्शित झालेल्या ‘नाच गो बया’ गाण्याला आतापर्यंत युट्यूबवर ८ लाख २६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर १७ हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. याशिवाय “खूप छान गाणं झालंय”, “सर्व महिलांनी एकत्र येऊन खूप छान डान्स केला”, “अतिशय उत्तम संकल्पना”, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या उमटल्या आहेत.

Story img Loader