सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. रेश्मा शिंदे, किरण गायकवाड यांच्यासह अनेक हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी लग्नगाठ आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तसंच काही कलाकार मंडळींची भावंडं बोहल्यावर चढताना दिसत आहेत. सध्या एकाबाजूला मृण्मयी देशपांडे, गौतमी देशपांडे यांच्या भावाचं लग्न पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला पूजा सावंतच्या भावाच्या लग्नसोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
मराठी सिनेसृष्टीतील ‘कलरफुल’ अभिनेत्री अशी ओळख असणारी पूजा सावंतने आपल्या अभिनयासह डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पूजाचं नाव जरी घेतलं तरी सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तिचा डान्स. ती जितक्या सहजतेने एखादा डान्स करते, ते सादरीकरण सतत पाहत राहावसं वाटतं. सध्या तिच्या एका डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा डान्स व्हिडीओ पूजाच्या भावाच्या संगीत सोहळ्यातला आहे. पूजाचा हा सख्खा भाऊ नाहीये.
हेही वाचा – Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीच्या मते करणवीर मेहरा नाही, तर ‘हा’ सदस्य होणार विजयी; म्हणाला…
पूजाचा भाऊ हेमंत दळवी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच त्याचा संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्यात पूजाने आपल्या भावंडांबरोबर ठेका धरला. वरुण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘राधा’ गाण्यावर पूजाने भावंडांबरोबर जबरदस्त डान्स केला. तिचा हा डान्स व्हिडीओ बहीण रुचिरा सावंतने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पुन्हा एकदा पूजाने आपल्या जबरदस्त डान्सने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
याशिवाय पूजाची बहीण रुचिरा सावंतने आणि हेमंत दळवीने करीना कपूर-शाहीद कपूरच्या ‘मौजा ही मौजा’ गाण्यावर डान्स केला. भावाच्या संगीत सोहळ्यातील डान्स व्हिडीओ रुचिराने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
दरम्यान, पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘मुसाफिरा’ चित्रपटात पाहायला मिळाली होती. पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’मध्ये तिने मेघाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात पूजासह पुष्कर जोग, स्मृती सिन्हा, पुष्कराज चिरपुटकर, दिशा परदेशी झळकले होते. त्यानंतर पूजा ‘क्रॅक’ चित्रपटातील एका गाण्यात विद्युत जामवालबरोबर डान्स करताना दिसली. मग पूजाचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांसाठी ती ऑस्ट्रेलियात राहत होती. पण ती पुन्हा मुंबईत परतली. त्यानंतर पूजाचं ‘नाच गो बया’ गाणं ५ जुलैला प्रदर्शित झालं. तिचं हे गाणं सुपरहिट झालं.