Pooja Sawant First Makar Sankranti Celebration: मराठी अभिनेत्री पूजा सावंतने लग्नानंतरची पहिली मकर संक्रात ऑस्ट्रेलियात साजरी केली. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून तिच्या मकर संक्रातीच्या सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे. पूजाचे आई- वडील व भाऊ आणि बहीणदेखील ऑस्ट्रेलियात आहेत, त्यांच्याबरोबर पूजा व सिद्धेश चव्हाण यांनी पहिली मकर संक्रात साजरी केली आहे.
व्हिडीओत पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण दोघेही संक्रांतीनिमित्त पारंपरिक काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. पूजाने काळ्या रंगाची पैठणी नेसली आहे, तर सिद्धेशने काळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. तसेच पूजाने पारंपरिक हलव्याचे दागिने घातले आहेत. व्हिडीओत दोघेही पूजा करताना दिसतात.
पूजाची आई तिला व सिद्धेशला ओवाळते, मग सिद्धेश सासूबाईंच्या पाया पडून आशीर्वाद घेतो. त्यानंतर पूजाचे आई-वडील लेक व जावयाबरोबर हसताना दिसतात. या व्हिडीओत पूजाची बहीण रुचिरादेखील दिसते. त्यानंतर सिद्धेश व पूजा पहिल्या संक्रांतीचं फोटोशूट करतात.
हेही वाचा – “मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
पाहा व्हिडीओ –
व्हिडीओत शेवटी हलव्याचे दागिने खाऊ शकतो का असं पूजा विचारते, त्यानंतर सिद्धेश ते खाण्याची अॅक्टिंग करताना दिसतो. पूजाचा हा पहिल्या मकर संक्रांतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
पूजाच्या या व्हिडीओवर अभिजीत खांडकेकर, अमृता खानविलकर यांनी कमेंट्स केल्या आहेत. पूजाच्या आई गीता सावंत यांनी रेड हार्ट इमोजी कमेंट्स केले आहेत. तर सिद्धेशच्या आई प्रिया चव्हाण यांनी ‘मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा. पूजा व सिद्धू सुंदर दिसताय,’ अशी कमेंट केली आहे.
हेही वाचा – सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास दोघांनी २८ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. सिद्धेश चव्हाण ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहे. तो ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा सण पूजा व सिद्धेशने ऑस्ट्रेलियात मराठी परंपरेनुसार साजरा केला होता. आता तिच्या पहिल्या संक्रांती सेलिब्रेशनची चांगलीच चर्चा होत आहे.