अभिनेत्री पूजा सावंत ही नेहमी तिच्या अभिनयाबरोबर सौंदर्यामुळे चर्चेत असते. पूजा ही उत्तम अभिनेत्री तर आहेच; पण ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. तिनं बऱ्याच चित्रपटांत काम केलं आहे. मात्र, तिची ‘लपाछपी’ चित्रपटातील भूमिका विशेष गाजली. तिला या चित्रपटासाठी ‘उत्कृष्ट अभिनेत्री’च्या पुरस्कारानंही गौरविण्यात आलं होतं. अशा या गुणी अभिनेत्रीनं नुकतंच लग्न संस्थेविषयी असलेलं तिचं मत आणि लग्नासाठी तिला कसा मुलगा हवाय? यावर भाष्य केलं आहे.
अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये पूजा सावंत सहभागी झाली होती. यावेळी पूजाला विचारलं गेलं, ‘लग्न संस्थेवर तुझा विश्वास आहे का? तसेच लिव्ह इन रिलेशनशिप किंवा ट्रायल मॅरेज याविषयी तुझं काय मत आहे?’ यावर पूजा सावंत म्हणाली, “माझा लिव्ह इन रिलेशनशिपवर अजिबात विश्वास नाहीये; पण माझा लग्न संस्थेवर पूर्ण विश्वास आहे.”
हेही वाचा – Ask SRK: ‘नयनतारा मॅमवर फिदा झालात?’ चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खानचं जबरदस्त उत्तर; म्हणाला, “ती…”
पुढे पूजा म्हणाली, “आपल्याकडे सगळं खूप मॉर्डन झालंय; जे चांगलं आहे आणि ते या पिढीचं आहे. पण मला असं वाटतं की, काही गोष्टी ज्या परंपरेनुसार चालत आल्यात, त्याच्यावर मी खूप विश्वास ठेवते. मला खरंच लग्न करायचं आहे. आता आयुष्य, रिलेशनशिप इतकं अस्थिर झालंय की, त्यामुळे मला आयुष्यात स्थिरता हवीय. म्हणून मला असा एक पार्टनर हवाय; ज्याच्याबरोबर मी उरलेलं आयुष्य काढेन.”
हेही वाचा – “याची जर कॉन्ट्रोवर्सी झाली तर…” प्रियदर्शनीनं शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर ओंकार राऊतची प्रतिक्रिया
हेही वाचा – “…त्या दिवशी माझा सगळा माज उतरला”; स्पृहा जोशीनं सांगितला अनुभव, म्हणाली…
त्यानंतर मुलाखदार भार्गवीनं विचारलं, ‘तुला नक्की कसा मुलगा हवाय? सुंदर आणि उंच याच्यापलीकडे तुला मुलाकडून काय अपेक्षा आहेत?’ या प्रश्नांवर पूजा सावंत म्हणाली, “एक तर मी घरातील मोठी मुलगी आहे. त्यामुळे मी अगदी लहानपणापासून सगळं सांभाळलंय. घर सांभाळलंय, नातेसंबंध सांभाळलेत. भावंडांना सांभाळलंय. काम सांभाळतेय. मी नेहमी सगळं सांभाळतंच असते. त्यामुळे मला असा कोणीतरी हवाय; जो मला सांभाळेल. माझं सगळं म्हणजे मूड स्विंग असेल, माझा आनंद असेल, मला रडायचं असेल, असं सगळं सांभाळणारा मला हवाय. पैसा हा कोणीही कधीही कमावू शकतं. मीपण कमावू शकते. त्यामुळे मला असा मुलगा हवाय; जो मला कधी दुखावणार नाही. या दोनच माझ्या माफक अपेक्षा आहेत.”