Pooja Sawant Engagement : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने मराठी सिनेसृष्टीबरोबरच हिंदीतही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंतने आता चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.

पूजा सावंतने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यात तिने We are engaged असं म्हणत काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोत ती आणि एक मुलगा दिसत असून यात ती तिच्या बोटातील अंगठी दाखवताना दिसत आहे.
आणखी वाचा : “ते दोघेही माझे…”, पूजा सावंतने केलं वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधानबरोबरच्या नात्यावर स्पष्ट भाष्य, म्हणाली…

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Larsen & Toubro (L&T) loses a significant Rs 70,000 crore submarine deal after CEO's controversial 90-hour workweek statement.
L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार…
Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Pooja Sawant First Makar Sankrant dance video
ऑस्ट्रेलियात पूजा सावंतचा बहिणीसह जबरदस्त डान्स! पहिल्या संक्रांतीला मराठमोळा साज, पाहा व्हिडीओ

“माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायासाठी मी सज्ज झाले आहे. ही प्रेमाची जादू असून आम्ही आमचा सुंदर प्रवास सुरु करत आहोत. We are engaged”, असे पूजा सावंतने म्हटले आहे.

पूजाने सलग तीन इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील सर्व फोटोत तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे पूजाचा होणारा नवरा कोण, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

आणखी वाचा : ‘झिम्मा १’नंतर ‘झिम्मा २’ चित्रपटाने जिंकली प्रेक्षकांची मनं, तीन दिवसात कमावले इतके कोटी

दरम्यान पूजाच्या या पोस्टनंतर अनेक कलाकार यावर कमेंट करताना दिसत आहेत. हेमंत ढोमे, सायली संजीव, तेजस्विनी पंडित, पुष्कर जोग यांसह अनेक सिनेसृष्टीतील कलाकारांनी यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader