पूजा सावंत मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच तिने साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. पूजाचा होणारा नवरा नेमका कोण आहे याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. सोशल मीडियावर फोटो शेअर करत पूजाने होणाऱ्या नवऱ्याचा चेहराही दाखवला होता. सिद्धेश चव्हाण असे पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. आता पूजाने सोशल मीडियावर तिच्या भावी नवऱ्यासाठी एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा-

Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Groom from Dubai duped by Instagram bride
दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?
Suraj Chavan
Video : सूरज चव्हाणला पाहून शाळेतली विद्यार्थिनी झाली भावुक; मिठी मारत म्हणाली, “मला तुला भेटायचं…”
groom was spotted playing ludo on a smartphone
तू इकडेपण हरलास… लग्नाच्या विधी सुरू असताना नवरदेव खेळतोय चक्क लुडो; पाहा VIRAL PHOTO
Aasiya Kazi Married to Gulshan Nain:
८ वर्षांच्या अफेअरनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं आंतरधर्मीय लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

पूजाने सिद्धेशबरोबरचा रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये पूजा सिद्धेशच्या मांडीवर बसल्याची दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “तुझ्या हृदयात कशी जागा निर्माण करायची हे मला आता महित आहे” पूजाने ही पोस्ट सिद्धेश चव्हाणला टॅगही केली आहे. पूजाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

काही दिवसांपूर्वीच “We are engaged…” असं म्हणत पूजाने होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये पूजाच्या हातात साखरपुड्याची अंगठीही बघायला मिळाली होती. या फोटोवरून पूजाने गुपचूप साखरपुडा उरकला असल्याचे समोर आले होते. या पोस्टनंतर चाहत्यांबरोबर अनेक कलाकारांनी पूजावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता.

हेही वाचा- पंकज त्रिपाठींच्या ‘मैं अटल हूं’ चित्रपटात झळकणार प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, साकारणार सुषमा स्वराज यांची भूमिका

पूजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत तिने अनेक सुरपहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिने मराठी मनोरंजन क्षेत्रात पदापर्ण केलं. ‘दगडी चाळ’ चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच गाजली. या चित्रपटात तिच्याबरोबर अंकुश चौधरीची मुख्य भूमिका होती. तसेच ‘नीलकंठ मास्तर’, ‘सतरंगी रे’, ‘आता गं बया’सारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.

Story img Loader