अभिनेत्री पूजा सावंत सध्या तिच्या आगामी ‘मुसाफिरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पुष्कर जोग दिग्दर्शित हा चित्रपट २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पूजासह पुष्कर, दिशा परदेशी, स्मृती सिन्हा, पुष्कराज चिरपुटकर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या हे कलाकार ‘मुसाफिरा’ चित्रपटाच्या प्रमोशन करण्यात व्यग्र आहेत. अशात पूजाने होणाऱ्या नवऱ्याच्या आठवणीत एक खास पोस्ट नुकतीच शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री पूजा सावंतने होणारा नवरा सिद्धेश चव्हाणबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “प्रमोशनच्या व्यग्र वेळापत्रकात…मला काय हवंय हे मलाच माहिती आहे….लवकर भेट सिद्धेश”

हेही वाचा – Video: सारा अली खानने करीना कपूरसमोर कार्तिक आर्यनला केलं फ्लाइंग किस, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न पाहत आहे का?”

पूजाच्या या पोस्टवर सिद्धेशने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला,”बोजू, तुझी खूप आठवणं येतेय. तुला भेटण्याची वाट पाहतोय. ” तसेच कलाकार मंडळींसह चाहत्यांनी देखील पूजाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – आधी लग्न न करताच झाली आई, आता अभिनेत्रीने दुसऱ्या बॉयफ्रेंडसह केला साखरपुडा, फोटो व्हायरल

दरम्यान, यंदाच पूजा व सिद्धेश लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी ‘मुसाफिरा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पूजा ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला उपस्थित राहिली होती. तेव्हा पूजा म्हणाली, “आम्हाला याच वर्षी लग्न करायचं आहे. त्याचं फेब्रुवारी, मार्चमध्ये भारतात येणं आहे. जर त्याला सुट्टी मिळाली तर मग चट मंगनी पट ब्याह अशा पद्धतीत लग्न होऊ शकतं. कारण वर्षभर पुढे मला वेळ नाहीये. मुंबईत लग्न होईल. मला डेस्टिनेशन वेडिंग नाही करायचं.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress pooja sawant share special post for fiance siddesh chavan pps