Prajakta Mali : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपट हिट झाल्याने प्राजक्ता खूप आनंदी आहे. सध्या प्राजक्ता मुंबईत नाही तर बँगलोर येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या आश्रमात आहे. तिथून ती अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत आहे.

प्राजक्ता माळीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. “महाराष्ट्रावर आणि कलेवर इतकं प्रेम नसतं तर या घडीला मी बँगलोर आश्रमात आश्रमवासी असते.
होय होय…इथे राहणं, ध्यान करणं इतकं आवडतं. आश्रमवासी नाही होऊ शकले तरी निदान १५-२० दिवस इथे सेवा करायला नक्कीच येईन. आणि सातत्याने इथे येत राहीन,” असं कॅप्शन प्राजक्ताने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओत ती आश्रमात काय करतेय, कोणत्या गोष्टी शिकतेय याबाबत तिने सांगितलं.

हेही वाचा – “ड्रेस किंवा लिपस्टिकला दोष देऊ नका”, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चनचा व्हिडीओ; म्हणाली, “स्वतःला कमी…”

प्राजक्ताच्या याच व्हिडीओवर तिला एका चाहत्याने देवासंदर्भात एक प्रश्न विचारला. त्याचं उत्तर प्राजक्ताने दिलं आहे. ‘तुझा देवावर विश्वास आहे का प्राजक्ता?’ असं विचारणाऱ्याला प्राजक्ता माळीने ‘होय’ असं उत्तर दिलं आहे.

prajakta mali believe in god
चाहत्याचा प्रश्न अन् प्राजक्ता माळीचं उत्तर

दरम्यान, प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘फुलवंती’ सिनेमा ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झाला. यात तिच्याबरोबर गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट हिट झाला असून तो प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे. आता प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या आगामी पर्वात झळकणार आहे.

Story img Loader