Phullwanti Movie on OTT: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) ‘फुलवंती’ चित्रपट चांगलाच गाजला. प्राजक्ताचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘फुलवंती’ ११ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. मात्र त्यात एक ट्विस्ट आहे. तो प्रेक्षकांना मोफत पाहता येणार नाही. प्राजक्ताने यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात तिने ‘फुलवंती’ चित्रपट आता ओटीटीवर उपलब्ध आहे, अशी माहिती दिली. प्रेक्षकांना ‘फुलवंती’ सिनेमा घरबसल्या पाहता येईल. मात्र त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागणार आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर रेंट देऊन पाहता येईल.

हेही वाचा – ‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी

“पुणे- मुंबई- नाशिक बाहेरचे प्रेक्षक, सातत्याने ‘फुलवंतीच्या’ शोबद्दल विचारणा करत होते. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. अमेझॉन प्राइमवर टिकिट काढा आणि घरबसल्या चित्रपट पाहा,” असं कॅप्शन देत प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. म्हणजेच ‘फुलवंती’साठी पैसे मोजावे लागतील. प्राइम व्हिडीओचे सबस्क्रिप्शन असूनही तो मोफत पाहता येणार नाही.

पाहा पोस्ट –

h

हेही वाचा५३व्या मजल्यावरील आलिशान घरात राहते माधुरी दीक्षित, पाहा तिच्या मुंबईतील घरातील Inside Photos

पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा असलेली आणि देखण्या कलाविष्काराने सजलेली ‘फुलवंती’ मराठी सिनेसृष्टीतील भव्यदिव्य कलाकृती आहे. या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अजूनही पुणे-मुंबईत हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये सुरू आहे. आता तो ओटीटीवर रेंटवर उपलब्ध आहे.

हेही वाचा – ‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी

‘फुलवंती’ सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत आहेत. तसेच इतर मराठी कलाकारांची यात मांदियाळी आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडेंनी केले आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. अविनाश- विश्वजीत यांनी संगीताची धूरा सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prajakta mali film phullwanti ott release update hrc