मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनयाबरोबर ती उत्तम कवयित्री, नृत्यांगना आणि निवेदक सुद्धा आहे. एवढंच नाही तर ती एक चांगली व्यावसायिका सुद्धा आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीचा काही दिवसांपूर्वी ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे चित्रीकरण परदेशात झाले होते. यावेळी चित्रीकरणादरम्यान आलेल्या अनुभवाविषयी प्राजक्ता माळी बोलली.
हेही वाचा – “माझी मुलगी सुरक्षित, ती भारतात…”; इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचाच्या आईची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
हेही वाचा – अविनाश नारकरांना नेटकरी म्हणाला ‘आजोबा’, ऐश्वर्या नारकरांनी दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…
‘तारांगण’ या एंटरटेन्मेंट मीडियाशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळीने परदेशातील चित्रीकरणाचा अनुभव सांगितला. ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्राजक्ताने परदेशात चित्रीकरण केले. याचा अनुभव सांगत म्हणाली, “मला बाहेरच्या देशात एवढे दिवस चित्रीकरणाचा अनुभव नव्हता. पण आपल्या देशात तयार होण्यासाठी व्हॅनिटी व्हॅन असते. एक चहा घेऊन या, असं बोलण्यासाठी एक स्पॉट दादा असतो. पण असं परदेशात होत नाही. कारण तुम्हाला तिकडे मर्यादित क्रूमध्ये काम करावं लागतं. व्हॅनिटी व्हॅन नसल्यामुळे फ्रेश होण्यासाठी कुठल्याही कॅफे, हॉटेलमध्ये कॉफी विकत घेऊन फ्रेश व्हायला लागतं. अशा बऱ्याच अडथळ्यांना परदेशात सामोर जावं लागतं.”
हेही वाचा – Video: दादा कोंडकेंच्या गाण्यावर अंशुमन विचारेचा बायकोबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
दरम्यान, ‘तीन अडकून सीताराम’ हा प्राजक्ताचा चित्रपट २९ सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्याबरोबर वैभव तत्त्ववादी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे असे तीन अभिनयाची भिन्न तऱ्हा असलेल्या कलाकारांनी काम केलं आहे. हृषिकेश जोशी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.