गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुक उघडल्यावर ‘बहरला हा मधुमास’ हे एकच गाणं कानावर पडत आहे. या गाण्याची अनेक कलाकारांना, इन्स्टाग्राम रिल स्टार्सला तसेच सर्वसामान्यांना भूरळ पडली आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील हे गाणं आहे. नुकतंच या गाण्यावर प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भाचीने डान्स केला आहे. तिने याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

प्राजक्ता माळी ही सोशल मिडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात प्राजक्ता माळीची भाची याज्ञसेनी नाचताना दिसत आहे. यावेळी तिच्यासमोर मोबाईलवर ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं लागलेलं दिसत आहे.
आणखी वाचा : “मी लग्न करायला तयार, पण…” प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”

या व्हिडीओच्या सुरुवातीला तिची भाची ही या गाण्यातील काही स्टेप्स हुबेहुब करताना दिसत आहे. विशेष म्हणजे फक्त सना शिंदे नव्हे तर अंकुश चौधरीच्या स्टेप्सही ती यावेळी करत आहे.

आणखी वाचा : Video : ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर किली पॉलच्या बहिणीचे रील, डान्स पाहून अंकुश चौधरी म्हणाला…

“नाच येत असेल नसेल, जाहीर अथवा गुपचूप, स्थळ काळ वय विसरून; नाचत रहा… जागतिक नृत्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”, अशी पोस्ट प्राजक्ता माळीने केली आहे.

दरम्यान प्राजक्ता माळी ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. तिने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तिने निवडलेल्या भूमिकांचे कायमच कौतुक होताना दिसते. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

Story img Loader