मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या अनेक मालिकांतून ती घराघरात पोहोचली. प्राजक्ता ही सध्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच तिने तिच्या आवडत्या विनोदी चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राजक्ता माळी ही गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. नुकतंच तिच्या चित्रपटाच्या निमित्ताने तिने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तुझा सर्वात आवडता विनोदी चित्रपट कोणता? याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने उत्तर दिले.
आणखी वाचा : “वर्षा बंगल्यावरुन निघालो आणि वेगळ्याच रस्त्याने…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“‘अशी ही बनवाबनवी’ हा माझा सर्वात आवडता विनोदी चित्रपट आहे. त्याबरोबरच ‘हेराफेरी’, ‘मालामाल विकली’ हे विनोदी चित्रपटही मला आवडतात. यासोबतच माझा पहिला चित्रपट ‘खो-खो’ हा देखील मला प्रचंड आवडतो.” असे तिने सांगितले.

“हा चित्रपट केदार शिंदेंनी ‘लोच्या झाला रे’ नाटकावरुन प्रेरणा घेऊन बनवला होता. त्याच्या मदतीला सात पूर्वज खाली येतात आणि ते आल्यामुळे त्याची किती गल्लत होते, अशी त्या चित्रपटाची कथा आहे. त्यामुळे हा चित्रपटही माझ्या सर्वात आवडता कॉमेडीपटांपैकी एक आहे”, असे प्राजक्ता माळीने म्हटले.

आणखी वाचा : “मला लंडनला खरेदी करता आली नाही, कारण…” प्राजक्ता माळीने सांगितला किस्सा, म्हणाली “माझे पैसे…”

दरम्यान प्राजक्ता माळी ही सध्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, अलोक राजवाडे असे अनेक कलाकार झळकताना दिसत आहे. गेल्या २९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला.