मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याची आघाडीची नायिका म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ताने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. तिच्या अभिनयाचा जितका चाहता वर्ग आहेत, तितकाच तिच्या सौंदर्याचा देखील चाहता वर्ग आहे. प्राजक्ता माळी अभिनयाबरोबर उत्तम कवयित्री, नृत्यांगना, निवेदक व्यावसायिका आणि निर्माती आहे. अशा या हरहुन्नरी प्राजक्ता माळीला नुकताच नवोदित कवयित्री म्हणून ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा ‘सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार’ याने गौरविण्यात आलं. यासंदर्भात अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री प्राजक्ता माळीने पुरस्कार प्रदान करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर तिने लिहिलं आहे, “पुरस्कार अनेक मिळतात पण साहित्य क्षेत्रातील संस्थांची मातृसंस्था असलेल्या ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचा’ पुरस्कार मिळणं; हे माझं अहोभाग्य. ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’चा ‘सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार’…नवोदित कवयित्री.”

हेही वाचा – Video: रांझना हुआ मैं तेरा…; ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकरचा संगीत सोहळ्यात रोमँटिक डान्स, पाहा व्हिडीओ

“स्थळ – माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड, पुणे. याच ठिकाणी प्राजक्तप्रभाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं होतं, पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं अशा ज्येष्ठ कवी प्रविण दवणे यांच्याच हस्ते पुरस्कार मिळाला. #योगायोग…अभिनेत्री असताना कवयित्री म्हणून सन्मान मिळणं हे दुर्मिळ…पाठीवर शाबासकीची थाप, पुढील लेखनासाठी प्रोत्साहन…मसापचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचे विशेष आभार,” असं प्राजक्ता माळीने लिहिलं आहे.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, साकारणार खलनायकाची भूमिका

दरम्यान, प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटाची अजूनही चर्चा सुरू आहे. ११ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ चित्रपटात प्राजक्तासह अभिनेता गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत झळकला आहे. तसंच प्रसाद ओक, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, क्षितीज दाते, हृषिकेश जोशी, सुखदा खांडकेकर, जयवंत वाडकर, सविता मालपेकर, दीप्ती लेले, सुनिल अभ्यंकर, निखिल राऊत असे अनेक तगडे कलाकार मंडळी ‘फुलवंती’ चित्रपटात झळकले आहेत.

हेही वाचा – ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला, “माझ्यावर कितीही रुसलीस…”

प्रवीण तरडेंच्या पत्नी स्नेहल तरडेने दिग्दर्शित केलेल्या फुलवंती चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. ‘फुलवंती’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. या नव्या प्रवासाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली होती, “‘फुलवंती’ सारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले. यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्कम पाठिंबा दिला, त्यातून माझा आत्मविश्वास उंचावला. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन, असा विश्वास मला आहे. दर्जेदार संहिता आणि उत्तम कलावंत यामुळे चित्रपटाच्या बरोबर आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prajakta mali was honored with the sunitabai smriti literary award as a poetess pps