अनेक मराठी चित्रपट आणि मालिका आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताचा सहजसुंदर अभिनय जितका प्रेक्षकांना आवडतो तितकंच तिचं सौंदर्य आवडतं. तिच्या सौंदर्याचा एक वेगळाच चाहता वर्ग तयार झाला आहे. प्राजक्ता अभिनयाबरोबर उत्तम कवयित्री, नृत्यागंणा आणि सूत्रसंचालिका सुद्धा आहे. एवढंच नाही तर ती एक चांगली व्यावसायिका सुद्धा आहे. तिचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड असून या माध्यमातून ती मराठमोळे पारंपारिक नवीन दागिने लाँच करत असते. तिने सुरू केलेल्या या ज्वेलरी ब्रँडला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशा या आघाडीच्या अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच शेअर केलेली पोस्ट ही ३१ डिसेंबर साजरा केल्यासंदर्भातली आहे. प्राजक्ताने ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाचं स्वागत आपल्या कुटुंबाबरोबर केलं. याचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने लिहिल आहे, “हे ३१ डिसेंबर संदर्भातील…आमचे बॉबी देओल आणि डॉन… २०२३चा शेवटचा आणि २०२४चा पहिला सेल्फी…नवीन वर्षातली पहिली पोस्ट…नवीन वर्षाच्या शुभेच्छा…”

Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा
Groom dance on Akhiyaan Gulaab song at wedding video viral on social media
काय भारी नाचलाय नवरदेव! वराचा ‘असा’ डान्स पाहून तुम्हीही व्हाल फिदा, VIDEO पाहून कराल कौतुक

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा १२०० भागांचा आणि ४ वर्षांचा यशस्वी प्रवास, मधुराणी प्रभुलकरने शेअर केले खास क्षण, म्हणाली…

प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती कुटुंबाबरोबर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील बॉबी देओलच्या ‘जमाल कडू’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर ती डॉन या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहे. मग ती चुली शेजारी बसून भाकऱ्या करताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी तिचे भाचीबरोबरचे सेल्फी आहेत.

अभिनेत्रीचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. तिच्या साध्या राहणीमानच अनेक जण कौतुक करत आहेत. प्राजक्ताच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने लिहिल आहे, “साधी राहणी उच्च विचारसरणी…खूप छान…विशेष म्हणजे चुलीवरची भाकरी…” तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “असेच क्षण जपायचे असतात प्राजक्ता आणि तू ते खूप भारी जपतेस. त्यामुळे तू आम्हाला खूप आवडतेस. तू भाकरी करतानाचा पूर्ण व्हिडीओ टाकना.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “सारं काही बाजूला ठेवून, सर्वांच्यात मिसळते म्हणून तर ‘प्राजक्ता’नव्याने कळते.”

हेही वाचा – Video: कोर्टात हर्षवर्धनचा डाव येणार समोर, अखेर सई होणार मुक्ता-सागरची, नेमकं काय घडणार? वाचा…

दरम्यान, प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, अलोक राजवाडे असे बरेच कलाकार पाहायला मिळाले होते. तसेच प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून सूत्रसंचालिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.

Story img Loader