मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेला ओळखले जाते. मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे प्रार्थना बेहेरे ही नावारुपाला आली. काही दिवसांपूर्वी ती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत झळकत होती. यात तिने नेहा हे पात्र साकारले होते. नुकतंच प्रार्थनाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगाबद्दल भाष्य केले.

प्रार्थनाने काही दिवसांपूर्वी तिचे युट्यूब चॅनल पुन्हा सुरु केले. त्यात तिने तिच्या घरातील गणपती बाप्पाचे व्हिडीओ शेअर केले होते. यातील एका व्हिडीओत तिने तिच्या आयुष्यात गणपती बाप्पाचे स्थान काय याबद्दल भाष्य केले. यावेळी प्रार्थना ही भावूक झाली.
आणखी वाचा : Video : “हाच दिवस, हीच वेळ…” प्रार्थना बेहेरेने पतीसह रोमँटिक व्हिडीओ केला शेअर, पहिल्या भेटीबद्दल केला खुलासा

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

प्रार्थनाने सांगितला ‘तो’ प्रसंग

“मी कॉलेजमध्ये होते. त्यादिवशी संध्याकाळी बाबा थोडे थकलेले दिसत होते. मी तेव्हा क्लासला जाण्यासाठी तयारी करत होते. त्यावेळी अचानक बोलता बोलता बाबांनी डोळे वर फिरवले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. मी आईला हाक मारली आणि बाबांना काय होतंय बघ असं सांगितलं. आई त्यांना अहो काय झालं अहो काय झालं, असं विचारत होती.

त्यावेळी आम्ही चौथ्या माळ्यावर राहायचो. त्या बिल्डींगमध्ये लिफ्ट नव्हती. मी जिन्याने खाली उतरले आणि बाजूच्या बिल्डींगमध्ये असलेल्या डॉक्टरांना शोधायला गेले. त्यादिवशी नेमका रविवार होता त्यामुळे डॉक्टर नव्हते. खाली एक कंपाउंडर राहायचा त्याला बघायला गेले तर तोही नव्हता. मग काय करु विचार करत असताना आमच्या बिल्डिंगमध्ये एक मुलगी होती जी प्रॅक्टिस करत होती. तिने बाबांना चेक केलं. ती म्हणाली काकांची नस मिळत नाही. रुग्णवाहिका बोलवावी लागेल. मी प्रचंड घाबरले.

मी बघितलं तर बाबा अजूनही त्याच परिस्थितीत होते. त्यावेळी जवळपास १५ मिनिटं उलटून गेली होती. मला काय करावं काहीही सुचत नव्हतं. मी थेट मंदिरात गेले आणि जोरजोरात अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली. मी बाप्पाला सांगितलं जोपर्यंत माझ्या बाबांना बरं वाटत नाही, तोपर्यंत मी हे म्हणत राहणार.

यानंतर १०-५ मिनिटांनी माझी एक मैत्रीण आली आणि तिने तुझ्या बाबांना शुद्ध आली, त्यांना रुग्णालयात नेतात, असे सांगितले. त्यानंतर मला जाणीव झाली की माझा श्वास प्रचंड चढला होता आणि मला काही कळत नव्हतं. मला जोरात खोकला लागला. त्यानंतर १५ मिनिटं मी उलट्या करत होते. मला आई म्हणाली, तू स्वतःला सांभाळ आणि ती बाबांसोबत रुग्णालयात गेली. यानंतर मावशी आली घरी. पण या सर्व प्रसंगावेळी मला जाणीव झाली की माझा बाप्पा माझ्यासोबत कायम आहे. तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही”, असे प्रार्थना बेहेरे म्हणाली.

आणखी वाचा : Video : “प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही…” बेडवरील ‘तो’ बोल्ड व्हिडीओ शेअर करताच प्रार्थना बेहरे ट्रोल

दरम्यान प्रार्थना बेहेरेने २००९ मध्ये मालिका विश्वात पदार्पण केले. झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील तिची भूमिका बरीच गाजली होती. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘मितवा’ या चित्रपटामुळे ती नावारुपाला आली. २०१७ साली अभिषेक जावकरशी लग्न केलं. तिचा पती दिग्दर्शक आणि लेखक आहे.

Story img Loader