मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेला ओळखले जाते. मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे प्रार्थना बेहेरे ही नावारुपाला आली. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. प्रार्थनाच्या लग्नाला बराच काळ उलटला आहे. आता तिने लग्नाला होकार का दिला, याबद्दल भाष्य केले आहे.

प्रार्थना बेहेरेने काही दिवसांपर्वी तिचे युट्यूब चॅनल सुरु केले. यावेळी तिने तिच्या अलिबागच्या घराची झलक दाखवली. त्याबरोबरच तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. यावेळी प्रार्थनाला तू माणसांमध्ये सर्वात आधी काय पाहतेस, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने फारच स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
d y chandrachud
D. Y. Chandrachud : प्रार्थनास्थळांबाबतच्या निर्णयावर माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी…”
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला

“मी समोरच्या माणसामध्ये नेमकं काय पाहते हे सांगायचं तर मला एखादा माणूस बोलताना पाचव्या मिनिटाला तो कसा आहे? ते कळतो. तो माणूस किती नम्र आहे, हे देखील मला कळते. जर तो नम्र असेल, दयाळू असेल तर तो माझ्यासारखा व्यक्ती आहे. म्हणजेच तो मला आवडणारा व्यक्ती आहे. पण जर तो तसा नसेल तर तो माझ्या टाइपचा नाही.”

“जर हा प्रश्न मुलांमध्ये काय बघते, असा असेल तर, मग त्याचं टोकदार नाक आणि उंची. मला वाटतं म्हणूनच मी अभीशी लग्न केलं. मी पहिल्यांदाच त्याला हा प्रश्न विचारलेला की तुझी उंची किती आहे? तो म्हणालेला ६. १. त्यावर मी त्याला ओके म्हटलं. त्यानंतर मी त्याला लांबून किंवा एका बाजूने पाहिलं तर त्याच नाक एकदम सरळ आणि छान होतं. त्यामुळेच मी त्याच्याशी लग्न केलं.” असे प्रार्थना बेहेरे म्हणाली.

आणखी वाचा : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीबद्दल प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

दरम्यान अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने २०१७ मध्ये दिग्दर्शक अभिषेक जावकरबरोबर लग्नगाठ बांधली. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर यांना ओळखले जाते. प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर यांचा विवाह १४ नोव्हेंबर २०१७ रोजी झाला होता. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे.

Story img Loader