मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. तिने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयच्या जोरावर बरंच नाव कमावलं आहे. प्रिया बापट ही सध्या विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच प्रियाने यंदाच्या वर्षाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.
प्रियाने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिला फोटो हा ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेबसीरिजच्या पोस्टरचा आहे. त्यानंतर दुसरा फोटो हा ‘रफुचक्कर’ या चित्रपटाचा आहे. तर तिसरा फोटो हा ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा आहे. या नाटकाच्या निमित्ताने तब्बल ९ वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियाने या फोटोला हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “रॅगिंग, प्रचंड त्रास अन्…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लोकप्रिय मालिकेबद्दल केला धक्कादायक खुलासा; म्हणाली “मी डिप्रेशन…”
प्रिया बापटची पोस्ट
“प्रत्येक महिन्याला माझा नवीन प्रोजेक्ट लाँच होतो आणि त्याला चांगले यश मिळते. मे २०२३ मध्ये सिटी ऑफ ड्रीम्स, जून २०२३ रफुचक्कर, त्यानंतर जुलै २०२३ ला एका चित्रपटाचे शूटींग आणि ऑगस्ट २०२३ ला जर-तरची गोष्ट हे मराठी व्यावसायिक नाटक. २०२३ च्या सुरुवातीपासूनच वैविध्यपूर्ण पात्रं साकारतेय. यामुळे विविध अनुभव गाठीशी जमा झालेत. तुमच्या प्रेमाबद्दल कृतज्ञ आणि यापुढे आणखी पात्र साकारण्यासाठी उत्सुक”, असे प्रिया बापटने म्हटले आहे.
आणखी वाचा : प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट, म्हणाली “तो मुलगा…”
दरम्यान ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. नाटकाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे.